शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम घाटात आढळली शिंगळ्या माशाची नवी जात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:04 IST

परकीय माशांमुळे जलपरिसंस्थांना धोका

कोल्हापूर : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध संशोधकांनी लावला आहे. स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन तसेच ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अभिषेक शिर्के यांच्या संयुक्त संशोधनातून ही प्रजाती समोर आली आहे.

नव्या माशाचा समावेश ॲम्ब्लिसेप्स या कुळामध्ये करण्यात आला असून, या प्रजातीचे नामकरण ॲम्ब्लिसेप्स वायव्य असे केले आहे. कोंकणी व मराठीतील ‘वायव्य’ म्हणजे ‘उत्तर-पश्चिम’ असा अर्थ असून, या प्रजातीचे वास्तव्य उत्तर-पश्चिम घाटात असल्याच्या संदर्भाने हे नाव देण्यात आले आहे. तसेच पश्चिम घाटात ॲम्ब्लिसेप्स वंशाच्या आढळाची ही आतापर्यंतची सर्वांत उत्तरेकडील नोंद मानली जात आहे. 

हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण असल्यामुळे माशाला लपण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध होतो. दुभंगलेली शेपटी, अपूर्ण मध्यरेषा आणि शेपटीच्या मध्यभागातील शिरांमध्ये आकड्यासारख्या रचनेचा अभाव तसेच वेगळी असलेली ‘ॲडिपोज फिन’ ही वैशिष्ट्ये या माशाला त्याच्या कुळातील इतर प्रजातींपेक्षा वेगळे ठरवतात.

परकीय माशांमुळे जलपरिसंस्थांना धोका

गोवा आणि महाराष्ट्रातील काही मर्यादित ठिकाणांवरच या प्रजातीची नोंद आढळून आली आहे. त्यामुळे या भागांतील ओढे आणि प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले. खाणकाम, औद्योगिक सांडपाणी, मायक्रोप्लास्टिक प्रदूषण तसेच परकीय माशांच्या प्रजातींचा प्रसार यांमुळे या जलपरिसंस्थांना धोका निर्माण होत असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली.

या संशोधनामुळे पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवासांच्या पर्यावरणीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गोड्या पाण्यातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. -अभिषेक शिर्के, संशोधक.

English
हिंदी सारांश
Web Title : New Catfish Species Discovered in Western Ghats of India

Web Summary : Researchers discovered a new catfish species, *Amblyceps wayanadensis*, in the Western Ghats. Found in shallow streams, it faces threats from mining, pollution, and invasive species. Conservation is crucial for this unique ecosystem.