शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींच्या फसवणूक प्रकरणी ‘न्यू महाराष्ट्र ग्रॅनाईट’च्या संचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST

कोल्हापूर : साजणी (ता. हातकणंगले) येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेच्या नावाखाली शासनाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या ...

कोल्हापूर : साजणी (ता. हातकणंगले) येथील न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्थेच्या नावाखाली शासनाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला होता. या फसवणूक प्रकरणी संस्थेचा फरार संचालक कुमार आकाराम कांबळे (रा. रुई, ता. हातकणंगले) याला मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने अटक केली. त्याला इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

साजणी (ता. हातकणंगले) येथे न्यू महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्था हे युनिट २००९ मध्ये सुरू केले होते. शासनाकडून सुमारे तीन कोटी रुपयांहून जादा अनुदान घेऊन हे युनिट सुरू झाले होते. पुढे ते बंद पडले. शासनाच्या वतीने लेखापरीक्षकांनी या संस्थेचे २०१० ते २०१८ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. त्यामध्ये शासनाची तीन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे आढळले. त्यामुळे शासनाच्या वतीने संस्थेचे चेअरमन तुळशीदास देसाई-कांबळे, सचिव अरविंद मुरुडकर व संचालक कुमार कांबळे यांच्याविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गतवर्षी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला; पण संशयित आरोपी फरार होते.

दरम्यान, साजणी येथील बंद पडलेल्या युनिटचा ताबा पोलिसांनी पंचनामा करून सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सुपूर्द केला. संशयित आरोपी कुमार कांबळे याने इचलकरंजी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याच वेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस हवालदार दिनेश उंडाळे हे संशयिताच्या मागावरच होते. या पोलीस पथकाने सायबर विभागाची मदत घेऊन संशयित आरोपीला शोधण्यासाठी इचलकरंजी, सांगली, मिरज भाग पिंजून काढला. मंगळवारी पहाटे त्याला जयसिंगपूर ते इचलकरंजी मार्गावर शिताफीने पकडले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

फोटो नं. ०२०२२०२१-कोल-कुमार कांबळे (आरोपी)