शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवउद्योग निर्माण होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 00:52 IST

कांचनताई परुळेकर : ‘कौशल्य विकास’ विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर : युवकांनी स्वयंरोजगार कौशल्य व सृजनशीलता आत्मसात करणे आवश्यक आहे. केवळ रोजगाराभिमुख युवकांची निर्मि$ती करणे काळाची गरज नसून, नवउद्योग निर्माण होणे आवश्यकआहे, असे प्रतिपादन स्वयंसिद्ध संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन व कौशल्य सृजनता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्य विकास’ या विषयावर मानव्यशास्त्र सभागृहात एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे बीसीयूडीचे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते. याप्रसंगी तेज कुरिअरच्या कार्यकारी संचालिका साधना घाटगे उपस्थित होत्या.युवकांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि सृजनशिलता या संदर्भात प्रोत्साहित करण्यासाठी या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परुळेकर म्हणाल्या, नवभारताच्या उभारणीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि स्वयंरोजगार संस्थांनी संयुक्तरीत्या जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.नवउद्योजिका, तेज कुरिअरच्या कार्यकारी संचालिका साधना घाटगे म्हणाल्या की, आधुनिक स्त्री ही अबला नसून, सबला आहे हे अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी सिद्ध केले आहे, म्हणून स्त्रियांनी आपले स्वकर्तृत्व जाणून उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी. स्त्रियांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून विकासाच्या नव्या पर्वात सहभागी व्हावे. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे म्हणाले की, विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या तीन लाख युवकांना स्वयंरोजगार व कौशल्य विकास अंतर्गत समावेश करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र दालन उभे केले आहे. २०२० पर्यंत कौशल्याभिमुख युवकांची मोठी निर्मिती भारतामध्ये होणार आहे. या युवकांना जागतिक व्यासपीठ खुले असणार आहे. याकामी शिवाजी विद्यापीठाचे कार्य भारतात अग्रस्थानी राहील, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयिका प्रा. डॉ. वासंती रासम म्हणाल्या, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचे अध्ययन, संशोधन नव्याने करणे व समाजातील स्त्रियांमध्ये आत्मभान व स्वयंसिद्धता निर्माण करण्याचे कार्य अध्यासनात सातत्याने केले जाते.डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी आभार, तर सागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. याप्रंसगी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. ( प्रतिनिधी )