शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कोलटकरांच्या कविता समजून घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : मराठी कवितेच्या प्रांतामध्ये अरुण कोलटकर यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचे आरोपण करण्याऐवजी ती समजून ...

कोल्हापूर : मराठी कवितेच्या प्रांतामध्ये अरुण कोलटकर यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचे आरोपण करण्याऐवजी ती समजून घेण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याची खरी गरज आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात बुधवारी उमटला.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत हे चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये प्रा. अविनाश सप्रे (सांगली), गणेश विसपुते (पुणे), अरुण चव्हाण (सांगली), बाळासाहेब आळवेकर (कोल्हापूर) सहभागी झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

कवितेच्या प्रांतात साचलेले निकृष्टपण दूर करण्यासाठीसुद्धा कोलटकरांच्या कवितेचा मापदंड लावणे गरजेचे आहे. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर हे दोघे आजच्या नवकवींसमोर आदर्श म्हणून उभे आहेत, ही खूप महत्त्वाची बाब असल्याचे प्रा. अविनाश सप्रे यांनी सांगितले. कोलटकरांच्या साहित्याविषयी मराठी साहित्यिक क्षेत्रातच खरे तर मोठी अनास्था आहे. त्यांची कविता विस्मित करणारी, दीपवून टाकणारी असल्याचे कवी गणेश विसपुते यांनी सांगितले. जीवन आणि त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी कोलटकर हे महाराष्ट्रभर पायी फिरले. त्यांना समजून घ्यायला आपण अद्यापही कमी पडतो आहोत, हे खेदजनक असल्याचे अरुण चव्हाण यांनी सांगितले. मराठी अधिविभागाने भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अरुण कोलटकरांसह अनेक नव्या-जुन्या प्रभावी साहित्यिक, कवींचा परिचय नव्या पिढीला घडवून आणला असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. त्यांनी कोलटकरांच्या ‘वामांगी’ कवितेचे वाचन केले. प्रा. श्रीकृष्ण कालगावकर यांच्या टिपणाचे वाचन सुश्मिता खुटाळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. अवनिश पाटील, प्रकाश पवार, रघुनाथ कडाकणे, नीलांबरी जगताप, उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला.

चौकट

सांस्कृतिक चळवळीचे केंद्र

कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोलटकर यांच्या स्मरणार्थ सभागृह उभारण्यात येत आहे. ते येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा बाळासाहेब आळवेकर यांनी व्यक्त केली.

फोटो (२००१२०२१-कोल-विद्यापीठ चर्चासत्र) : कोल्हापुरात बुधवारी शिवाजी विद्यापीठातील ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी ‘वामांगी’ कवितेचे वाचन केले. यावेळी डावीकडून गणेश विसपुते, बाळासाहेब आळवेकर, अरुण चव्हाण, अविनाश सप्रे, रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे उपस्थित होते.