शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना चाचणीस पुढाकार घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

निपाणी : निपाणी शहरासह ग्रामीण भागातही आता कोरोनाचा फैलाव वाढला आहे. सध्या ग्रामीण भागात ताप, सर्दी खोकल्याची साथ असून ...

निपाणी : निपाणी शहरासह ग्रामीण भागातही आता कोरोनाचा फैलाव वाढला आहे. सध्या ग्रामीण भागात ताप, सर्दी खोकल्याची साथ असून या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक चाचणीसाठी पुढे येत नसल्याने अनेक पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ही बिनधास्त आहेत. असे रुग्ण किरकोळ आजार समजून कोरोना स्प्रेडर ठरत आहेत.

निपाणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. निपाणी शहरातील पाच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत तालुक्यातील ग्रामीण भागात ताप, सर्दी, खोकला यासह अन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. हे रुग्ण किरकोळ आजार समजून गावातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. आशा रुग्णांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे.

ताप, सर्दी यासह अन्य आजारांवर उपचार घेणारे रुग्ण किरकोळ आजार समजून समाजात मुक्तपणे वावरत असल्याने काही रुग्ण कोरोना स्प्रेडर ठरता आहेत. चाचणीच करून न घेतल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह कळेनासे झाले आहे. त्यामुळे स्वतःला लक्षणे असलेल्या रुग्णांनी चाचणी करून घेतल्यास समाजाच्या हिताचे होणार आहे. त्यामुळे घाबरून न जाता अशा रुग्णांनी स्वतःहून चाचणी करून घेणे आवश्यक आहे.