शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी संघर्षाची गरज

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

भरमा कांबळे : उत्तूरला तालुकास्तरीय अधिवेशन उत्साहात

उत्तूर : बांधकाम कामगारांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. प्रश्न सुटण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर संघर्ष करण्याची गरज आहे. संघर्ष केला तरच न्याय मिळतो. त्यामुळे बांधकाम कामगारांनी एकजूट उभी करून आपली ताकद गावा-गावांतून उभी करावी, असे प्रतिपादन बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी आजरा तालुकास्तरीय लालबावटा बांधकाम कामगार संघटना आयोजित पहिल्या अधिवेशनात बोलताना केले.कॉ. गोविंद पानसरेंच्या प्रतिमेचे पूजन करून कै. कॉ. मलाबादे, के. एल. बजाज, माजी खासदार सदाशिव मंडलिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कॉ. कांबळे म्हणाले, आजरा तालुक्यात कामगार मंडळात महिलांची संख्या उल्लेखनीय आहे. वाढत्या महागाईमुळे कष्टकरी वर्गाचे जगणे मुश्कील बनले आहे. संघर्ष केला तरच पदरात पडते, अन्यथा काहीच मिळत नाही. तालुका, गावपातळीवरील संघर्षासाठी कामगारांनी काम करावे तरच प्रश्न सुटतील. महिला कामगार महिलेला प्रसुती रजा मिळावी, कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी ५० हजारांचा निधी मिळावा अशी मागणी केली. काँंगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, शिवसेना यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. यासाठी लाल-बावटा हा पर्याय उभा करा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. भाऊसाहेब कसबे, जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचलन केले. नवनाथ चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)पानसरेंवर गोळ्या कुणी झाडल्या : नारकरकष्टकरी जनतेचे सेवक असणारे कॉ. गोविंद पानसरेंवर गोळ्या झाडणारे कोण आहेत? त्यांचा तपास अजून का लागत नाही. लढाई करणारी मंडळी सरकार चालवणाऱ्यांना नको आहेत. तातडीने पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, अशी मागणी अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. डॉ. उदय नारकर यांनी केली. न्यायासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले.अधिवेशनातील प्रमुख मागण्याकॉ. पानसरेंच्या मारेकऱ्याला अटक करा, दीपावली भेट ५ हजार रूपये द्या, ज्येष्ठ कामगारांना ३ हजार पेन्शन द्या, घरासाठीचे अनुदान ताबडतोब द्या, लॅपटॉप/टॅबलेट शिष्यवृत्ती निधी द्या, जिल्हा स्तरावर कामगार मंडळ स्थापन करावे, कोल्हापूर, इचलकरंजी बरोबरच आजरा, चंदगड, भुदरगडसाठी गडहिंग्लज येथे स्वतंत्र कार्यालय करा यासाठी मोर्चाचे आयोजन प्रांताधिकारी कार्यालयावर करण्याचे ठरले.