शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

उदगावमध्ये रस्ता सुरक्षितता उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST

शुभम गायकवाड / उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. वाढत्या वाहतुकीमुळे हा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनत ...

शुभम गायकवाड / उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. वाढत्या वाहतुकीमुळे हा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी आंदोलनेही झाली आहेत. सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्ग हा उदगावच्या प्रवेशद्वारातूनच जातो. वाहतुकीच्या कोंडीची सुरुवातच उदगावपासून होत आहे. कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उदगावच्या प्रवेशद्वारालाच ही परिस्थिती असल्याने गावचा श्वास गुदमरत आहे. उदगाव हे कोल्हापूर जिल्ह्याचे सुरुवातीचे गाव आहे. लगतच दोन औद्योगिक वसाहती आहेत. याच मार्गावरून पाच साखर कारखान्यांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतूक उदगाव-शिरोळ बायपास मार्गाने करावी; तर सामान्य वाहतूक उदगाव-जयसिंगपूर मार्गे करावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. तरीदेखील वाहनचालक मनमानी करीत असल्याने वाहतूक समस्या निर्माण होत आहेत.

गेल्या महिन्याभरात अपघातात सहाजणांनी जीव गमावला; तर पंधराजण जखमी झाले आहेत. उदगावच्या रेल्वे पुलाजवळील कमानही अवजड वाहतुकीमुळे पडली होती. असे असतानाही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. जर अवजड वाहतूकदार त्यांची मनमानी करीत असतील यावर मोठे आंदोलन करू, अशी नागरिकांची भूमिका असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

-----------------

कोट -

उदगाव येथील रेल्वे पूल व रिलायन्स पंप येथे पांढरे पट्टे मारणे व गतिरोधक बसविणे, दिशादर्शक फलक लावणे अशा उपाययोजना आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू; तर टेक्निकल शाळेजवळही विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून पांढरे पट्टे मारण्यात येतील.

- जे. सी. बागवान, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

-------------------- कोट

सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच वर्दळीचा आहे. त्यावर रस्ता चौपदरी करणे, उड्डाणपूल बांधणे हे प्रश्न उच्चस्तरीय जरी असले तरी स्थानिक प्रशासनाने सामान्य उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

- अशोक वरेकर, उदगाव ग्रामस्थ.

फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगावच्या प्रवेशद्वाराला वाहतुकीच्या कोंडीला सुरुवात होते.