शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये ‘राष्ट्रवादी’चा लाटणे मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 01:22 IST

संजय गांधी निराधार योजना : महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; लाभार्थ्यांना आॅगस्टपासून पेन्शन पूर्ववत मिळणार

कागल : संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास साडेतीन हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांची मासिक पेन्शन बंद केल्याच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर भव्य लाटणे मोर्चा काढण्यात आला. हजारो वयोवृद्ध, विधवा, अपंग महिलांचा सहभाग, घोषणाबाजी आणि एका महिलेने तहसील कार्यालयाच्या इमारतीसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, तहसीलदार शांताराम सांगडे यांनी येत्या आॅगस्ट महिन्याच्या एक तारखेला या अपात्र लाभार्थ्यांना पूर्ववत पेन्शन देऊन त्यांची फेरचौकशी आणि सुनावणी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. येथील गैबी चौकातून लाटणे मोर्चास प्रारंभ झाला. शहराच्या मुख्य मार्गावरून बसस्थानक ते मुरगूड नाका मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसील कार्यालयाच्या गेटवर हा मोर्चा पोलिसांनी रोखला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांबद्दल जर शंका असेल, काय माहिती हवी असेल तर संबंधिताला लेखी कळवून त्याचे म्हणणे घेऊन सुनावणीनंतर त्याची पेन्शन बंद करता येते, असे शासनाचे परिपत्रक असताना अधिकाऱ्यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून साडेतीन हजार लाभार्थ्यांची पेन्शन बंद केली आहे. हा बेकायदेशीर निर्णय मागे घ्यावा, असा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बंद केलेली पेन्शन पूर्ववत सुरू करावी. या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत कार्यालयासमोरून आम्ही उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. तहसीलदार सांगडे, पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून मोर्चाबाबत माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार पोलीस बंदोबस्तात मोर्चास सामोरे गेले. ते म्हणाले, राधानगरी तहसीलमार्फत सर्व्हे होऊन चौकशीअंती हे लाभार्थी अपात्र ठरविले आहेत. आम्ही फेरचौकशी करू. यावर आंदोलकांनी आधी पेन्शन वर्ग करा आणि मगच चौकशी सुरू करा, अशी भूमिका घेतली. अखेर २०१२च्या शासन परिपत्रकाचा संदर्भ घेत सुनावणी घेऊन कार्यवाही करण्याचे तसेच तत्पूर्वी ही बंद ठेवलेली पेन्शन सुरू करण्याचे लेखी पत्र देण्याचे तहसीलदारांनी कबूल केले. त्यानंतर आ. मुश्रीफ आणि प्रमुख कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले. पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.यावेळी भय्या माने, शिवानंद माळी, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, वसुधा कुंभार, संजय हेगडे यांची भाषणे झाली. युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नविद मुश्रीफ, आशाकाकी माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, रघुनाथ जकाते, नेताजी मोरे, प्रवीण भोसलेंनी मोर्चाचे नेतृत्व केले.