शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला दिले गाव सणाचे स्वरूप

By admin | Updated: February 20, 2015 00:08 IST

ऐक्याचे दर्शन : एकाच छताखाली पालखी सोहळा

दत्तात्रय पाटील -म्हाकवे -शिवजयंती म्हटलं की, चौकाचौकांत भव्य मंडप, इतिहासाची गाथा गाणारा डॉल्बी, असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते; पण या सर्वालाच फाटा देत घराघरांत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून भडगाववासीयांनी (ता. कागल) शिवरायांना मानाचा मुजरा केला. शिवाय गावातील सर्व तरुण मंडळे, विद्यार्थी, आबालवृद्ध यांनी एकाच छताखाली येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढली. तुतारीसह सवाद्य निनादाने या पालखी मिरवणुकीत संपूर्ण गावात ऐक्याचे दर्शन घडून आले.सुमारे अडीच ते तीन हजार लोकवस्ती असणाऱ्या या गावातील सर्व तरुण मंडळांनी एका छताखाली येऊन शिवजयंतीला व्यापक स्वरूप दिले. मिरवणुकीसाठी खास पालखीही तयार करण्यात आली.दरम्यान, या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यादृष्टीने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. यासाठी जालंदर खतकर, मच्छिंद्र खतकर, समाधान सोनाळकर, वैभव भांडवले, दिग्विजय पाटील, रणजित खतकर, पिंटू चौगुले, युवराज भांडवले, प्रवीण चौगुले, आदी तरुणांसह गावातील सर्वच शिवप्रेमींसह न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेच्या शिक्षक व चिमुकल्या शिवप्रेमींनीही परिश्रम घेतले.तरुणाईचा उत्साह डॉल्बीसमोर नाचण्यासाठी बहुदा तरुणांची चढाओढ असते. मात्र, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा जयघोषामुळे मिरवणुकीत वीरता संचारलेल्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये पालखीचा भोई होण्यासाठी आणि पालखी खांद्यावर जास्तीत जास्त वेळ घेण्यासाठी तरुणांत चढाओढ लागली होती.