भाजपच्या संघटन मंत्रिपदी नाथाजी पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:30+5:302021-02-05T07:02:30+5:30

भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा संघटन मंत्रिपदी भाजपचे नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आल्याचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष ...

Nathaji Patil elected as BJP's Union Minister | भाजपच्या संघटन मंत्रिपदी नाथाजी पाटील यांची निवड

भाजपच्या संघटन मंत्रिपदी नाथाजी पाटील यांची निवड

भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा संघटन मंत्रिपदी भाजपचे नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आल्याचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. नाथाजी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, भुदरगड तालुकाध्यक्ष, आदी संघटनात्मक पदावर, तसेच आकुर्डे (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व १५ वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व बिद्री सह. साखर कारखान्याचे प्रशासक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.. ह्या कार्यक्रमावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवान काटे, गारगोटी ग्रामपंचायत सदस्य अलकेश कांदळकर, दीपक शिरगावकर, पृथ्वीराज यादव, वैशाली नयकवडे, माधुरी कुरणे, जि. प. सदस्या अनिता चौगले, दत्ता मेडशिंगे, जिल्हा चिटणीस प्रवीणसिंह सावंत संयोजक कोल्हापूर जिल्हा ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

या निवडीबद्दल नाथाजी पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. फोटो ओळ

निवडीनंतर नाथाजी पाटील यांचा सत्कार करताना समरजित घाटगे, भगवान काटे, विनायक परुळेकर, आदी उपस्थित होते.

२९ नाथाजी पाटील निवड

Web Title: Nathaji Patil elected as BJP's Union Minister