नरसिंह पाणी पुरवठा संस्था साडेचार टन ऊस पाणीपट्टी घेणार : अध्यक्ष प्रा. स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:08+5:302021-09-23T04:27:08+5:30

लाटवडे (ता. हातकणंगले) येथील संस्थेच्या कार्यालयात २५ व २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ...

Narasimha water supply organization will take four and a half tons of sugarcane water: President Pvt. Owner | नरसिंह पाणी पुरवठा संस्था साडेचार टन ऊस पाणीपट्टी घेणार : अध्यक्ष प्रा. स्वामी

नरसिंह पाणी पुरवठा संस्था साडेचार टन ऊस पाणीपट्टी घेणार : अध्यक्ष प्रा. स्वामी

लाटवडे (ता. हातकणंगले) येथील संस्थेच्या कार्यालयात २५ व २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

प्रा. स्वामी म्हणाले, पाणी पुरवठा योजनेचे बहुतांश क्षेत्र हे माळरानावर आहे. महापुरामुळे नदीकाठचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत होईल. उत्कृष्ट कारभारामुळे संस्थेच्या ठेवीत वाढ झाली आहे. शेतीच्या अनुषंगाने प्रबोधनासाठी परिसंवादाचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. एन. वाय. पाटील, बशीर मुल्ला यांनी चर्चेत सहभाग घेतला. स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, अहवाल वाचन सचिव डॉ. निवास पाटील यांनी केले.

सभेस वारणा साखर कारखान्याचे अधिकारी बाळासो माने, संभाजी पाटील, रंगराव पाटील, सुरेश पाटील, भीमराव पाटील, पांडुरंग पाटील, विष्णू पाटील, संभाजी यादव, कोंडिबा पवार, आदी उपस्थित होते. आभार संचालक प्रा. दत्तात्रय पाटील यांनी मानले.

फोटो ओळी- लाटवडे येथील नरसिंह सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या सभेत अध्यक्ष प्रा. तानाजी स्वामी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. डी. पाटील, रंगराव पाटील, बाळासाहेब माने, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

Web Title: Narasimha water supply organization will take four and a half tons of sugarcane water: President Pvt. Owner