शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका पथकांची ८२ व्यक्तींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 17:35 IST

CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८२ नागरिकांवर महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये नागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमहापालिका पथकांची ८२ व्यक्तींवर कारवाईनागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांचा समावेश

कोल्हापूर : शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८२ नागरिकांवर महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये नागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांचा समावेश आहे.शहरात फिरताना मास्कचा वापर अनिवार्य असून सोशल डिस्टन्स राखण्याण्यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवायची आहेत, परंतु या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात ठिकठिकाणी महापालिकेची पथके अशा नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेऊन आहेत. नियम तोडणाऱ्या ८२ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार रुपये दंड वसूल केला.

संचारबंदी असतानाही खरेदीचे कारण सांगून घराबाहेर पडून विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात अशी चाचणी करण्यात येत आहे. गेल्या सोमवारी कपिलतीर्थ भाजी मंडईत चौदा तर रविवारी लक्ष्मीपुरीतील सहा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या होत्या. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनेक कोरोनाबाधित शहरातून फिरत आहेत.

सोमवारी मिरजकर तिकटी येथे महापालिका पथकाने काही नागरिकांना अडवून त्यांची सक्तीने रॅपिड ॲन्टिजन चाचणी केली. त्यावेळी सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन दिवसांपूर्वी रॅपिड ॲन्टिजन टेस्ट बिंदू चौक व लक्ष्मीपुरी येथे घेण्यात आली. यावेळी ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व कोरोनाबाधित नागरिकांना डीओटी सेंटरला व किणी वठार येथील नागरिकाला पारगाव येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे.

शहरात गर्दीच्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी गर्दी टाळावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस