शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभेत ‘त्या’ अकरा विषयांवरून पुन्हा गोंधळ

By admin | Updated: August 18, 2015 01:04 IST

इचलकरंजीचे राजकारण : सभेसाठी कॉँग्रेसकडून नगरसेवकांना व्हीप

इचलकरंजी : नगरपालिकेच्या मागील सभेमध्ये झालेल्या गोंधळात घेण्यात आलेले अकरा विषय रद्द करून पुन्हा तेच विषय सोमवारच्या सभेत विषयपत्रिकेवर घेण्यावरून सभेच्या सुरुवातीलाच कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परस्परांवर झालेल्या शेरेबाजीमुळे टीकाटिप्पणी होऊन काही काळ गोंधळ झाला. मात्र, दोन्ही सभेमधील विषय समान असल्याने मागील सभेतील ठरावामध्ये चर्चा करून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेतील गुंठेवारी नियमितीकरण व आरक्षणे वगळण्याचा असलेला शहर विकास आघाडीचा प्रतिष्ठेचा विषय मात्र पुढील सभेमध्ये घेण्याचे ठरले. सोमवारच्या सभेसाठी राष्ट्रीय कॉँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप लागू केला होता. जुलै महिन्यामधील दि. ९ रोजी झालेल्या सभेमध्ये सभेच्या अध्यक्षपदावर उपनगराध्यक्षांना बसविण्याऐवजी शहर विकास आघाडीच्या पक्षप्रतोदांना बसविल्याबद्दल कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना जाब विचारला होता. तेव्हा अभूतपूर्व गोंधळ माजला. या गोंधळातच नगराध्यक्षांनी सभेच्या पटलावर असलेले विषयपत्रिकेतील १५ ते २६ या क्रमांकाचे विषय मंजूर झाल्याचे घोषित केले होते. मात्र, हे विषय मंजूर करू नयेत, अशी तक्रार राष्ट्रीय व राष्ट्रवादी या दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. हे अकरा विषय मंजूर झाल्याचे समजून त्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते; पण या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी नसल्याने ते विषय मुख्याधिकारी सुनील पवार यांनी प्रलंबित ठेवले होते. या अकरा विषयांमध्ये शहरातील स्वच्छता व कचरा उठाव, लेक वाचवा अभियानांतर्गत नवीन जन्मलेल्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची ठेव ठेवणे, गुंठेवारी नियमितीकरण व आरक्षणे वगळणे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांचा अंतर्भाव होता. त्यामुळे या अकरा विषयांसाठी विशेष सभा बोलवावी, अशा प्रकारचे निवेदन ‘शविआ’ने नगराध्यक्षा बिरंजे यांना दिले होते. त्याप्रमाणे आजची सभा नगराध्यक्षांनी आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेमध्ये झालेल्या त्या अकरा विषयांचे प्रस्ताव रद्द करावे आणि आजची सभा सुरू करावी, अशी सूचना कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी मांडल्यामुळे खळबळ माजली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी मागील सभेमधील त्या विषयावर दुरुस्ती करावी, असे सूचित केले. मात्र, राष्ट्रीय कॉँग्रेस ही सूचना मानत नसल्याने कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी परस्परांवर टीकाटिप्पणीही करण्यात आली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. यावेळच्या चर्चेत भीमराव अतिग्रे, संभाजीराव काटकर, अजित जाधव, सुनील पाटील, संजय कांबळे, रवींद्र माने, रणजित जाधव, सयाजी चव्हाण, मदन झोरे, भाऊसाहेब आवळे, आदींनी भाग घेतला. अखेर मागील सभेतील प्रस्तावांमध्ये सोमवारच्या झालेल्या सभेमधील चर्चेच्या निर्णयानुसार दुरुस्ती करून हे विषय मंजूर करण्यात येतील, असे म्हणणे नगराध्यक्षा बिरंजे यांनी मांडले. घरोघरीच्या कचऱ्यासाठी अडीच कोटी नगरपालिकेच्या सभेमध्ये घरोघरी कचरा जमा करून तो कचरा डेपोवर टाकण्याचा दोन कोटी नऊ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्याबरोबरच शहरातील प्रत्येक कुटुंबाला प्लास्टिकची डस्टबीन देण्यासाठी ५० लाख रुपयास मंजुरी दिली. तसेच नगरपालिकेला मिळालेल्या कावीळ निवारणाच्या दोन कोटी रुपये विशेष निधीतील एक कोटी रुपये अन्यत्र खर्चासाठी सहमती दर्शविण्यात आली.