महापालिका निवडणूक - जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:25+5:302021-09-23T04:28:25+5:30

राज्य सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारल्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे. एका प्रभागात तीन उमेदवार निवडून द्यावे लागणार ...

Municipal Elections - Addition | महापालिका निवडणूक - जोड

महापालिका निवडणूक - जोड

राज्य सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारल्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे. एका प्रभागात तीन उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा, तर एक काँग्रेसचा उमेदवार असू शकतो. महाविकास आघाडीला त्याचा लाभ मोठा होऊ शकतो. त्यादृष्टीनेच त्रिसदस्यीय प्रभाग रचना केली असेल, असा अंदाज आहे.

महापालिकेची पहिलीच निवडणूक -

कोल्हापूर महानगरपालिकेची बहुसदस्य प्रभाग असलेली पहिलीच निवडणूक असेल. त्यामुळे या निवडणुकीविषयी उत्सुकता आहे. यापूर्वी नगरपालिका असताना एकदा द्विसदस्य प्रभाग रचनेवर आधारित निवडणूक झाली होती.

महापालिका निवडणूक प्रक्रिया रद्द -

गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात निवडणुकीच्यानिमित्ताने प्रभाग निश्चिती, प्रभाग आरक्षण, मतदार याद्या आदी प्रक्रिया पूर्ण झाली होती. ती आता रद्द होणार आहे. पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

पॉईंटर -

- १५ नोव्हेंबर २०२० महानगरपालिका सभागृहाची मुदत संपली

- दहा महिने महापालिकेत प्रशासकांचा कारभार

- गत सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची सत्ता

Web Title: Municipal Elections - Addition