शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेची माहिती महापालिका संकलित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोविड संसर्गाच्या काळात बेड उपलब्ध होत नाही म्हणून होणारा गोंधळ टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन रोज खासगी रुग्णालयातील बेडची ...

कोल्हापूर : कोविड संसर्गाच्या काळात बेड उपलब्ध होत नाही म्हणून होणारा गोंधळ टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन रोज खासगी रुग्णालयातील बेडची माहिती संकलित करणार आहे. त्यासाठी मोठ्या रुग्णालयात तीन पाळ्यांत चोवीस तास कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, दोन दिवसांत माहिती संकलनाचे काम सुरू होईल.

जिल्ह्यात सर्वत्र कोविड रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णसुद्धा कोल्हापुरात उपचाराकरिता दाखल होत आहेत. रुग्णांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका कोविड सेंटर्स सुरू करीत आहे.

गतवर्षी बेड मिळत नाहीत म्हणून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. रात्रभर रुग्ण घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. काही रुग्णांना बेड मिळाले नाहीत म्हणून त्यांना प्राण गमवावे लागले होते, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने यावेळी खबरदारी घेतली आहे.

शहरातील सर्वच खासगी रुग्णालयातील बेडची एकूण संख्या, तेथील रुग्णांची संख्या, शिल्लक बेडची संख्या किती आहे याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे संकलित केली जाणार आहे. त्याकरिता मोठ्या खासगी रुग्णालयात तीन पाळ्यांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. रोज ही माहिती संकलित केली जाणार असून, गरजू रुग्णांना ती देण्यात येणार आहे.