शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण ‘उपकेंद्र सहायक’ कागदपत्र पडताळणी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महावितरण कंपनीतील उपकेंद्र सहायक भरती रद्द करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महावितरण कंपनीतील उपकेंद्र सहायक भरती रद्द करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर कागदपत्रे व डायरी भिरकावली. भरती प्रक्रिया थांबवत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर अखेर उपकेंद्र सहायक कागदपत्र पडताळणी स्थगित करण्यात आली.

महावितरणमध्ये उपकेंद्र सहायकाची दोन हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ‘एसईबीसी’साठी २४५ पदे राखीव आहेत. या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती माेर्चाने केला आहे. याबाबत ‘मराठा क्रांती’च्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना जाब विचारला. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरू असल्याचे निर्मळे यांनी सांगितले. यावर जोरदार आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. संतप्त सचिन तोडकर यांनी कागदपत्रे फाडून, तर स्वप्निल पार्टे यांनी टेबलवरील डायरी निर्मळे यांच्या दिशेने भिरकावल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांना शांत केले.

पदाधिकाऱ्यांंचे रौद्र रूप पाहून प्रभाकर निर्मळे यांनी प्रादेशिक संचालक, पुणे अंकुश नाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आंदोलनकर्त्यांची भूमिका सांगितली. यावर कागदपत्र पडताळणी प्रक्रिया स्थगित करण्यास त्यांना सांगितले.