मोटारसायकल चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:22+5:302021-02-05T06:53:22+5:30

लखन कृष्णात माने (वय २८, रा. वंदूर, ता. कागल), आबासो अरुण तारळेकर (४२, रा. साकोर्डी, ता. कराड, जि. सातारा) ...

Motorcycle thief arrested | मोटारसायकल चोरट्याला अटक

मोटारसायकल चोरट्याला अटक

लखन कृष्णात माने (वय २८, रा. वंदूर, ता. कागल), आबासो अरुण तारळेकर (४२, रा. साकोर्डी, ता. कराड, जि. सातारा) अशी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी यासाठी चोरीच्या मोटारसायकली वापरल्या. या मोटारसायकली सांगली, पंढरपूर, संकेश्वर या ठिकाणाहून चोरल्या आहेत, तर दोन मोटारसायकली चोरणाऱ्या मल्लेशगोंडा ऊर्फ विनायक सिद्धगोंडा पाटील (रा. संकेश्वर, जि. बेळगाव) यासही अटक केली आहे. या तिघा चोरट्याकडून पाच मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. सुळकूड ते गजबरवाडी रस्त्यावर रविवारी (दि.२४) शेताकडे चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसडा मारून तोडले आणि मोटारसायकलीवरून पळून गेले. या प्रकारानंतर कागल पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयावरून आरोपींना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यासह अन्य गुन्हे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलिसांनी हा तपास केला.

Web Title: Motorcycle thief arrested