दत्तवाडमधून मोटरपंप चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:53+5:302021-09-22T04:28:53+5:30

दत्तवाड : दत्तवाड (ता.शिरोळ) येथील शेतातील मोटर पंप व वायर रोप असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून ...

Motor pump stolen from Dattawad | दत्तवाडमधून मोटरपंप चोरीस

दत्तवाडमधून मोटरपंप चोरीस

दत्तवाड : दत्तवाड (ता.शिरोळ) येथील शेतातील मोटर पंप व वायर रोप असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मधुकर कलगोंडा पाटील यांनी कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दिली आहे.

सुनील भंडारे यांचा सत्कार

जयसिंगपूर : कुरुंदवाड एसटी आगाराचे चालक सुनील गुलाब भंडारे (रा.हसूर) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उत्कृष्ट एसटी चालक म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोळ येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दगडू माने, अशोक कांबळे, राजेंद्र प्रधान, राजेंद्र दाभाडे, फिरोज मुजावर, चिदानंद कांबळे, खंडेराव हेरवाडे, कृष्णा लोहार उपस्थित होते.

जयसिंगपूर येथे बैठक व्यवस्था

जयसिंगपूर : येथील झेले हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षा बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आज बुधवारपासून एफ ०००७१७ ते एफ ०००७३० अखेर विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत, तरी संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन केंद्र संचालक यांनी केले आहे.

Web Title: Motor pump stolen from Dattawad