सरकारी लॅबपेक्षा खासगी लॅबमध्येच जादा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:39+5:302021-05-31T04:17:39+5:30

खासगी लॅबमध्ये होत असलेल्या कोराेना चाचण्या हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण, सरकारी लॅबपेक्षा खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे ...

More positive in private labs than in government labs | सरकारी लॅबपेक्षा खासगी लॅबमध्येच जादा पॉझिटिव्ह

सरकारी लॅबपेक्षा खासगी लॅबमध्येच जादा पॉझिटिव्ह

खासगी लॅबमध्ये होत असलेल्या कोराेना चाचण्या हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण, सरकारी लॅबपेक्षा खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे अहवाल जादा संख्येने पॉझिटिव्ह येत आहेत. दि. १५ मे ते २९ मे या पंधरा दिवसांतील आकडेवारी पाहता सरकारी रुग्णालयातील आरटीपीसीआर चाचण्यांचे ७६७९ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर याच काळात खासगी लॅबमध्ये झालेल्या चाचण्यांचे ९५४४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही संख्या २१६५ ने जादा आहे. या पंधरा दिवसांत खासगी लॅबपेक्षा सर्वाधिक चाचण्या या सरकारी लॅबमध्ये झालेल्या आहेत.

कोरोनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. जरा जरी काही लक्षणे असल्याची जाणीव झाली की फॅमिली डॉक्टर खासगी लॅबमधून चाचणी करून घेण्याचा, एचआरसीटी करून घेण्याचा सल्ला देतात. सरकारी लॅबमध्ये चाचणी करून घेऊ का, असे जेव्हा रुग्ण विचारतो तेव्हा खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सकडून सरकारी लॅबमधील अहवाल ॲक्युरेट असेलच असे नाही, अशी भीती घातली जाते. त्यांच्या सल्ल्यानुसार रुग्ण गेला की मग पुढील फरफट सुरू होते. खिसा कापण्याचे काम सुरू होते, असा अनेकांना अनुभव येत आहे. परंतु, खासगी लॅबवर प्रशासनाचे नियंत्रण असल्याचे दिसत नाही.

Web Title: More positive in private labs than in government labs