रामचंद्रपंत अमात्य यांच्या चरित्रग्रंथाचे सोमवारी प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:45 IST2021-02-06T04:45:29+5:302021-02-06T04:45:29+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य आणि पाच छत्रपतींच्या कालावधीत स्वराज्यसेवा करणारे हुकूमतपनाह श्री रामचंद्रपंत अमात्य यांच्या चरित्र ...

Monday's publication of Ramchandrapant Amatya's biography | रामचंद्रपंत अमात्य यांच्या चरित्रग्रंथाचे सोमवारी प्रकाशन

रामचंद्रपंत अमात्य यांच्या चरित्रग्रंथाचे सोमवारी प्रकाशन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य आणि पाच छत्रपतींच्या कालावधीत स्वराज्यसेवा करणारे हुकूमतपनाह श्री रामचंद्रपंत अमात्य यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या ३०५ व्या स्मृतिदिनी सोमवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.

स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष डाॅ. अमर आडके आणि सचिव नील पंडित बावडेकर यांनी ही माहिती दिली. माईसाहेब बावडेकर अकॅडमीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

आडके म्हणाले, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पन्हाळा येथील अमात्य यांच्या समाधीला अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी साडेपाच वाजता ॲड. साैरभ अनंत देशपांडे यांनी लिहिलेल्या अमात्य यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सीआयडीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. माईसाहेब बावडेकर अकॅडमीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला विश्वस्त विश्वनाथ कोरी, राजू राऊत, ॲड. देवव्रत पंडित बावडेकर उपस्थित होते.

०५०२२०२१ कोल अमात्य बावडेकर

Web Title: Monday's publication of Ramchandrapant Amatya's biography