शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल सहापदरीकरणाला सात वर्षांनी मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील कागल ते सातारा या सुमारे १२७.१५ किमी लांबीच्या सहापदरीकरणाला तब्बल सात वर्षांच्या ...

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील कागल ते सातारा या सुमारे १२७.१५ किमी लांबीच्या सहापदरीकरणाला तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुहूर्त मिळाला. डिसेंबर २०१७ पासून तब्बल २२ वेळा सहापदरीकरणाची निविदा व शुद्धीपत्रक काढूनही तांत्रिक कारणांनी रद्दबातल केली होती. अखेर गेले अडीच वर्षे ‘जैसे थे’ स्थितीनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातल्याने सहापदरीकरणाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाला. या सहापदरीकरणाच्या कामासह विविध रस्ते कामांचा कोनशिला व लोकार्पण समारंभ शनिवारी (दि. २५) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते दुपारी ३ वाजता कऱ्हाड (जि. सातारा) येथे होत आहे.

मुंबई ते चेन्नई (बंगलोर) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ साठी पुणे, सातारा, बंगलोर आणि चेन्नई असा सुमारे १४१९ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. वाहतुकीचा ताण वाढल्याने संपूर्ण मार्गाचे सहापदरीकरण पूर्ण केले असले, तरीही महाराष्ट्रातील सातारा ते कागलपर्यंतच्या सुमारे १२७ किमी लांबीच्या रस्त्याचे सहापदरीकरण काम गेले सात वर्षे रखडले. रखडलेल्या कामाची निविदा प्रक्रिया डिसेंबर २०१७ पासून सुरू झाली; पण पुढील ५३७ दिवसांत तांत्रिक कारण पुढे करत ‘नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एनएचआय) तब्बल २२ वेळा निविदेचे शुद्धीपत्रक काढल्याने काम रेंगाळले. अखेर ती निविदा प्रक्रिया मे २०१९ मध्ये रद्दबातल ठरवली. त्यानंतर ते काम जैसे थे अवस्थेत होते. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातल्याने सहापदरीकरणाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाला. त्यामुळे गेले सात वर्षे प्रतीक्षेत असणारा सहापदरीकरण रस्ता लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

सातारा ते कागल रस्ता

- अंतर : १२७ किलोमीटर

- रोज वाहनांची ये-जा : ८० हजारांहून अधिक

- जमीन अधिग्रहण : ९८ टक्के

- -----------------

पुणे ते बंगलोर रस्ता

- २००२ : दुपदरीकरण पूर्ण

- २००५ : चौपदरीकरण पूर्ण (राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत)

- २०१४ : सहापदरी रस्ताकाम पूर्ण (सातारा ते कागलवगळता)

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील ५९७१ कोटीं खर्चाचे रस्ते होणार

- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सात मार्गांचे काम सुरू होत आहे. सुमारे ३३०.८० किलोमीटर लांबीचे सुमारे ५,३९८ कोटींच्या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. यामध्ये आजरा-आंबोली- संकेश्वर, कळे-कोल्हापूर यासह इतर रस्त्यांची कामेही होणार. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण ४०३ किमी लांबीच्या ५,९७१ कोटींच्या खर्चाच्या कामाला प्रारंभ होत आहे.