आमदार चंद्रकांत पाटील यांची विद्यापीठ, न्यू कॉलेजला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:30+5:302021-04-04T04:23:30+5:30

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठ व न्यू कॉलेजला नॅकचे मानांकन मिळाल्याबद्दल सदिच्छा भेट ...

MLA Chandrakant Patil's goodwill visit to University, New College | आमदार चंद्रकांत पाटील यांची विद्यापीठ, न्यू कॉलेजला सदिच्छा भेट

आमदार चंद्रकांत पाटील यांची विद्यापीठ, न्यू कॉलेजला सदिच्छा भेट

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी शिवाजी विद्यापीठ व न्यू कॉलेजला नॅकचे मानांकन मिळाल्याबद्दल सदिच्छा भेट दिली व संस्थांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठास नॅकचे ३.५२ ‘सीजीपीए’ गुणांकनासह मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या या उल्लेखनीय मानांकनाबद्दल आमदार पाटील यांनी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या मानांकनामुळे विद्यापीठाची जबाबदारी वाढली असून, पुढील मानांकन प्राप्त होण्यासाठी तसेच विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, डॉ. आर. के. कामत, प्रा. एन. बी. गायकवाड, प्रा. एम. एस. देशमुख आदी उपस्थित होते.

न्यू कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व कॉलेजचे कौतुक केले. या मानांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कॉलेजला नवी उर्जा मिळेल यातून अधिक-अधिक चांगले विद्यार्थी व खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही प्राचार्य पाटील यांनी यावेळी दिली. उपप्राचार्य डॉ. एम. शेख, नॅक को-ऑर्डिनेटर डॉ.एन.व्ही पवार, आर.डी.धमकले आदी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक

शिवाजी विद्यापीठामध्ये नो व्हेइकल डे असल्यामुळे आमदार पाटील यांनी विद्यापीठाच्या गेट पासून ते मुख्य इमारती पर्यंतचा प्रवास विद्यापीठाच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून प्रवास केला. पर्यावरणपूरक या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

०३०४२०२१-कोल-चंद्रकांतदादा भेट

शिवाजी विद्यापीठास नॅकचे मानांकन मिळाल्याबध्दल शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठास व न्यू कॉलेजला सदिच्छा भेट देवून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Web Title: MLA Chandrakant Patil's goodwill visit to University, New College