विद्यार्थिनीशी गैरवर्तन, शिक्षकाला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:28 IST2021-05-25T04:28:28+5:302021-05-25T04:28:28+5:30

कोल्हापूर : अल्पवयीन असलेल्या माजी विद्यार्थिनीला शाळेत बोलवून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्राथमिक शिक्षकाची मुलीच्या ...

Mistreatment of student, beating of teacher | विद्यार्थिनीशी गैरवर्तन, शिक्षकाला चोपले

विद्यार्थिनीशी गैरवर्तन, शिक्षकाला चोपले

कोल्हापूर :

अल्पवयीन असलेल्या माजी विद्यार्थिनीला शाळेत बोलवून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्राथमिक शिक्षकाची मुलीच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी कपडे फाटेपर्यंत यथेच्छ धुलाई केली. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील पूर्व भागातील कडवी नदीकाठी वसलेल्या एका गावात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, मूळचा परजिल्ह्यातील असणारा हा ' करामती ' शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून या गावातील शाळेत ठाण मांडून आहे. याच शाळेत शिकलेल्या एका अल्पवयीन माजी विद्यार्थिनीला चार दिवसापूंर्वी या शिक्षकाने दुपारच्या वेळेत शाळेत बोलवून घेतले. ही विद्यार्थिनी शाळेत गेली असता या शिक्षकाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला . दरम्यान, संबंधित शिक्षकाचा वाईट हेतू लक्षात येताच या विद्यार्थिनीने शाळेतून थेट आपले घर गाठले. दोन दिवसानंतर तिने शाळेत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयातील लोकांना सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयातील लोकांनी व ग्रामस्थांनी रविवारी या करामती शिक्षकाला गावाशेजारीच जाब विचारत त्याची अंगावरील कपडे फाटेपर्यंत चांगलीच धुलाई केली.

Web Title: Mistreatment of student, beating of teacher