मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिनी ‘दक्षिण राष्ट्रवादी’तर्फे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST2021-04-20T04:24:09+5:302021-04-20T04:24:09+5:30

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (बुधवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सायबर चौकात ...

Minister Mushrif's birthday program by 'Dakshin Rashtravadi' | मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिनी ‘दक्षिण राष्ट्रवादी’तर्फे कार्यक्रम

मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिनी ‘दक्षिण राष्ट्रवादी’तर्फे कार्यक्रम

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (बुधवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सायबर चौकात कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी कोरोना नियमावलीचे उल्लघंन न करता कार्यक्रम घेण्याचा ठराव करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नितीन पाटील होते.

मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामपुरीतील दिव्यांग गरीब मुलीला व्हिलचेअर प्रदान करण्यात येणार आहे. सायबर चौक परिसरातील भाजी व फळ विक्रेत्यांसह फेरीवाले यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. मंत्री मुश्रीफ यांचे लोककल्याणकारी कार्य अखंडपणे सुरु ठेवून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी राजारामपुरीतील मारुती मंदिरात मूर्तीला अभिषेक घालण्यात येणार आहे. या बैठकीला फिराेज सौदागर, सुरेंद्र माने, दीपक कश्यप, सुरेश भोसले, प्रतीक कांबळे, तमन्ना शेख, सुप्रिया माळी, मुमजात बुलबले, आदी उपस्थित होते.

Web Title: Minister Mushrif's birthday program by 'Dakshin Rashtravadi'