शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांना यश, कोल्हापूर जि.प.च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत

By समीर देशपांडे | Updated: March 17, 2026 17:18 IST

गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समितीबरोबर आता जिल्हा परिषदेचेही सभापतीपद कागलला

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या शिल्पा शशिकांत खोत (रा.सेनापती कापशी ता.कागल) यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी कृष्णात पाटील (रा.गडमुडशिंगी ता.करवीर) यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केवळ अर्ध्या तासातील प्रशासकीय प्रक्रियेनंतर या निवडीची घोषणा केली. 

यानंतर जिल्हा परिषदेसमोर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आल्याने आपल्याच पक्षाला अध्यक्षपद मिळावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताकद पणाला लावली होती. त्यात ते यशस्वी झाले.

महाविकास आघाडीच्यावतीने कॉंग्रेसच्या रसिका पाटील आणि संभाजी पाटणकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतू गटनेते सुधीर देसाई, संग्राम कुपेकर यांच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतले. या सभागृहातील ६८ पैकी तब्बल ५१ सदस्य महायुतीकडे आहेत.

गेल्या काही दिवसात सांगली आणि सातारा जिल्हा परिषदेत भाजपला एकटे पाडण्याच्या घडामोडी सुरु असताना कोल्हापूरच्या अध्यक्ष निवडीबाबतही संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतू रविवारी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदासाठी त्यांच्याच तालुक्याला प्राधान्य दिले असून सव्वा वर्षासाठी या निवडी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Hasan Mushrif's efforts succeed: NCP's Shilpa Khot is Kolhapur ZP President.

Web Summary : Shilpa Khot of NCP elected Kolhapur Zilla Parishad President, BJP's Tanaji Patil Vice-President. Minister Hasan Mushrif secured the position for his party. Mahavikas Aghadi withdrew nominations. The election saw celebrations after the result.