लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : 'गोकुळ'च्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यांमधील ताणलेले संबंध कमी करून महायुती म्हणून एकसंध राहण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी रात्री मंत्री पाटील व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर रविवारी, सकाळी भाजपच्या आमदारांसमवेत कोल्हापुरात बैठक झाली, त्यानंतर दुपारी 'जनसुराज्य' पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते.
'गोकुळ' दूध संघाने दुग्ध विभागाला सादर केलेल्या मतदार यादीवरून भाजप व राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांमध्ये वाद उफाळला आहे. दूध संस्था पात्र-अपात्रचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यात भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी संघाच्या कारभारावर बोट ठेवत ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याने महायुतीतील वाद चिघळला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा वाद मिटवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये शनिवारी रात्री बैठक झाल्याचे समजते. महायुतीतील वाद आणखी वाढू नये म्हणनू मंत्री पाटील यांचे प्रयत्न असून, त्यानुसार रविवारी सकाळी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील, आमदा अमल महाडिक, 'गोकुळ'च्या संचालिक शौमिका महाडिक यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर, मंत्री पाटील व आमदा विनय कोरे यांची चर्चा झाल्याचे समजते.
मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांचा एकत्र रेल्वे प्रवास
मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेमधून एकत्र प्रवास केला. या दरम्यान त्यांच्यात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी उठवलेल्या आवाजावरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी रात्री मंत्री चंद्रकांत पाटील व मुश्रीफ यांनी पुणे येथून एकाच ट्रेनमधून प्रवास करीत रविवारी सकाळी कोल्हापूर गाठले त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे.
सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके उशिरा पोहोचले
माजी आमदार सुरेश हाळवणकर, पक्षाचे ज्येष्ठ नेते हिंदूसव शेळके हेही कोल्हापुरातील 'त्या' हॉटेलवर आले होते. मात्र, तत्पूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील हे तेथून निघून गेले होते.
मंत्री चंद्रकांत पाटील हे ज्यावेळी कोल्हापुरात येतील, त्यावेळी मी त्यांची भेट घेतो. आज, अक्षय्य तृतीया असल्याने भेटून शुभेच्छा दिल्या. आमच्यामध्ये 'गोकुळ'बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अमल महाडिक, आमदार
Web Summary : Minister Chandrakant Patil initiated efforts to resolve the Gokul milk union dispute between BJP and NCP leaders before elections. Discussions involved Minister Hasan Mushrif, BJP MLAs, and Janasurajya MLA Vinay Kore to maintain alliance unity.
Web Summary : मंत्री चंद्रकांत पाटिल ने चुनाव से पहले भाजपा और एनसीपी नेताओं के बीच गोकुल दूध संघ विवाद को सुलझाने के लिए प्रयास शुरू किए। गठबंधन एकता बनाए रखने के लिए मंत्री हसन मुश्रीफ, भाजपा विधायकों और जनसुराज्य विधायक विनय कोरे के साथ चर्चा हुई।