कोजिमाशि सरवडे शाखेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:04+5:302021-02-05T07:01:04+5:30

यावेळी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित मुख्याध्यापक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबईचे कौन्सिल ...

Meritorious felicitation on behalf of Kojimashi Sarvade Branch | कोजिमाशि सरवडे शाखेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

कोजिमाशि सरवडे शाखेच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

यावेळी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित मुख्याध्यापक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबईचे कौन्सिल सदस्य, कै. डी. बी. पाटील विचारमंच पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिवम प्रतिष्ठान राशिवडेचे पुरस्कारप्राप्त शिक्षक, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य अशा विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र रानमाळे म्हणाले, माजी अध्यक्ष व तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सभासद हितासाठी दूरदृष्टी विचारांतून संस्था भक्कम पायावर उभी आहे. नूतन अध्यक्ष बाळ डेळेकर हे संस्थेच्या प्रगतीसाठी आपले निश्चितच योगदान देतील. कार्यक्रमात बी. डी. खतकर, वाय. एम. सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो : सरवडेत कोजिमाशी शाखेच्यावतीने रेखा पाटील यांचा सत्कार करताना प्रतिभा पाटील, शेजारी राजेंद्र रानमाळे, अरविंद किल्लेदार, संजय डवर

Web Title: Meritorious felicitation on behalf of Kojimashi Sarvade Branch