शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

संगीतसूर्यांची स्मृती जपणारा रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली.

कोल्हापूर : संगीत रंगभूमीवर नव्या युगाचा प्रारंभ करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श संस्थेचा वारसा ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांनी जपला. त्यांच्यामुळे केशवरावांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे कार्य घडले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली. त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. सुरुवातीला त्यांनी बापूरावांची जुनी नाटकेच सादर केली; पण त्यात नावीन्य आणि नवी नाटके रंगमंचावर आणत ललितकलादर्शला ऊर्जितावस्थेत आणले. त्यांनी सादर केलेली दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर, आदी नाटके गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांनी गाईलेली ‘आई तुझी आठवण येते’ आणि ‘तू जपून टाक पाऊल जरा’ ही गाणी अजरामर झाली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी भारतयात्रा काढली आणि महाराष्ट्राबाहेरील रसिकांना आपले नाट्याविष्कार दाखवून तृप्त केले. भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली. गायन आणि अभिनयात अत्यंत पारंगत असल्याने त्यांनी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला. नवी पिढी यात यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे. - सुधीर पोटे (गायक)खडतर परिस्थितीत संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा पाया रचण्यात भालचंद्र पेंढारकर यांचे योगदान होते. सांस्कृतिक चळवळ सुरू करणे आणि ती नेटाने चालविण्याचे आव्हान पेंढारकर यांनी पेलल्याने ही समृद्धता अनुभवता आली. - भारती वैशंपायन (गायिका)