देशव्यापी संपादिवशी बिंदू चौकात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:49+5:302021-09-23T04:27:49+5:30

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी धोरणासह खासगीकरण, बेरोजगारीच्या विरोधात भाजपेतर पक्षांनी येत्या सोमवारी (दि. २७) पुकारलेल्या देशव्यापी ...

Meetings at Bindu Chowk on a nationwide day | देशव्यापी संपादिवशी बिंदू चौकात सभा

देशव्यापी संपादिवशी बिंदू चौकात सभा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी धोरणासह खासगीकरण, बेरोजगारीच्या विरोधात भाजपेतर पक्षांनी येत्या सोमवारी (दि. २७) पुकारलेल्या देशव्यापी संपात कोल्हापूरकरही सहभागी होत आहेत. सर्व डावे पक्ष, संघटना, राष्ट्रवादी, जनता दल, आपसह सर्व लहान-मोठे पक्ष रस्त्यावर उतरून मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आक्राेश करणार आहेत. तहसील कार्यालयावर निदर्शने आणि बिंदू चौकात सभा असे आंदोलनाचे नियोजन आहे.

यासंदर्भात आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी बुधवारी दुपारी शेकाप कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. शेकापचे संपतबापू पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत किसान सभेचे नामदेव गावडे, डाव्या संघटनांचे रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, शेकापचे बाबूराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ठरलेल्या नियोजनानुसार सोमवारी सकाळी १० वाजता बिंदू चौकात सर्व कार्यकर्ते एकत्र जमून निदर्शनास सुरुवात करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिंदू चौकातच जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी याच दिवशी सकाळी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयासमोर निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलनही होणार आहे.

Web Title: Meetings at Bindu Chowk on a nationwide day