शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापूर नियंत्रणासाठीची तीन जिल्ह्याची आज कोल्हापुरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

कोल्हापूर: पावसाळा तोंडावर असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या संदर्भात आगाऊ नियोजनासाठी म्हणून कोल्हापुरात कोल्हापूरसह सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांची आज ...

कोल्हापूर: पावसाळा तोंडावर असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या संदर्भात आगाऊ नियोजनासाठी म्हणून कोल्हापुरात कोल्हापूरसह सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांची आज सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह तीन जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता उपस्थिती राहणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्याबरोबरच अलमट्टीसंदर्भातही धोरण ठरणार आहे.

कोल्हापूरसह सांगलीला सलग दोन वर्षे महापुराचा जोरदार फटका बसला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तीव्रता कमी होती. याला कारण धरणातील पाण्याचे केलेले काटेकोर नियोजन हे होते. ऑगस्टमध्ये जास्त पाऊस गृहीत धरून जून-जुलैमध्येच धरणातील पाणीसाठा कमी ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्याचे परिणामही चांगले आले. यावर्षी देखील असेच नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. मे महिन्यात पाण्याची मागणी वाढते, पण यावर्षी संपूर्ण मे महिन्यात चार-आठ दिवसांच्या अंतराने वादळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचीही पाण्याची मागणी घटली परिणामी लघू प्रकल्पांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा या मोठ्या धरणांमध्ये अजूनही ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. यावर्षी माॅन्सून चांगला बरसणार असल्याचा हवामान अंदाज पाहता जुलैमध्ये धरणे शंभर टक्के भरण्याचा धोका आहे. त्यामुळेच गतवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आजच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

कोल्हापूर, सांगलीतील भीषण महापुरास अलमट्टीच्या पाण्याच्या फूग कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. महापुराच्या अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीने हा आरोप फेटाळून लावला असला तरी महापूर आणि अलमट्टी हे समीकरण घट्टच बसले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू आधीपासून अलमट्टीच्या पाणी नियोजनावरून वादाला सुरुवात होते. राज्य सरकारने मंत्रालय पातळीवर कर्नाटक राज्याशी समन्वय साधण्यासाठी सचिव पातळीवर नियंत्रण समिती नेमली आहे. त्याचीही अजून बैठक झालेली नाही. पण आज होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर देखील प्राधान्याने चर्चा होणार आहे.