शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या

By admin | Updated: July 4, 2016 00:35 IST

कपडे, सुका मेवा खरेदीला प्राधान्य : ‘शबे कद्र’च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नामस्मरण, नमाज, कुराणाचे पठण

 कोल्हापूर : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदमुळे शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गर्दीने गजबजून गेल्या. कपड्यांसह सुका मेवा, अत्तरे यांचा प्रामुख्याने खरेदीत समावेश होता. सायंकाळी चारनंतर पावसाने थोडी विश्रांती दिल्याने खरेदीचा ओघ वाढला होता. यामध्ये कपडे, सुकामेवा खरेदीला प्राधान्य देण्यात येत होते. रेडीमेड कपड्यांमध्ये बाजीराव मस्तानी ड्रेसला मोठी मागणी आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’मधील ड्रेसलाही युवावर्गाची पसंती आहे. यासह लाँग कुर्तीज, लाशा, शरारा, अनारकली, कॉटन प्रिंट, मटेरिअलला मोठी मागणी आहे. ईदबरोबर काही दुकानांमध्ये मान्सून सेल लागल्याने या ठिकाणीही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. कपड्यांच्या खरेदीबरोबरच त्या दिवशीचा महत्त्वाचा शिरकुर्मा अर्थात खिरीची साहित्यखरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये बदाम, काजू, चारोळी, खारीक, खोबरे, वेलदोडे, केशर, आक्रोड, मगज बी, नियमित हातांवर वळलेल्या शेवया, मिरज येथील भाजकी शेव यांना मागणी अधिक आहे. विशेष म्हणजे काजूचा दरही ८०० ते ९०० रुपये प्रतिकिलो असा प्रतवारीनुसार आहे. बाजारपेठेत आणखी दोन दिवस अशीच गर्दी राहण्याची चिन्हे आहेत. या खरेदीबरोबरच सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुगंधी अत्तरेही बाजारात आली आहेत. यामध्ये होमी, मुफ्ती, माही, आइसबॉय, ब्लू लूमानी, मस्क, या परदेशी अत्तरांचा बोलबाला अधिक आहे. मुस्लिम बांधवांनी बिंदू चौक येथील ईद फेस्टिव्हल, महाद्वार रोड, जोतिबा रोड, इब्राहिम खाटीक चौक, हत्तीमहल रोड, माळकर तिकटी, पापाची तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी येथील दुकानांमध्ये गर्दी केली होती. शबे कद्र (बडी रात) ४रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये एक महत्त्वाची रात्र म्हणून ‘शबे कद्र’ (बडी रात) २६ व्या रोजाच्या मगरीबच्या नमाजापासून सुरू झाली. ही रात २७ व्या अर्थात रविवारच्या इफ्तारी ७.१४ वाजता संपली. ४हा रोजा मुस्लिम बांधवांसह अन्य धर्मीयांनी मोठ्या उत्साहात केला. यामध्ये मुस्लिम बांधवांनी अल्लाहचे नामस्मरण, नमाज पठण, कुराण पठण केले. हा रोजा बाबूजमाल दर्गा, बडी मस्जिद येथे हिंदू-मुस्लिम महिलांनी एकत्रितरीत्या सोडला. यंदा राज्यावर दुष्काळी सावट होते. मात्र, पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिल्याने यंदा ईद उत्साहात साजरी होईल. याकरिता नवीन आधुनिक फॅशनचे कपडे, बुरखा, जॅकेट, टोपी यासह हातातील तस्बी अर्थात जप करण्यासाठीची अंगठीही बाजारात आली आहे. गेले दोन दिवस पावसाची रिमझिम आहे; परंतु त्यातही ग्राहकांचा उत्साह चांगला आहे. - फारूख मोमीन, दान कलेक्शन देव एकच असतो, या शिकवणीप्रमाणे ‘बडी रात’चा हा २७ वा रोजा मुस्लिम महिलांबरोबरच गेली कित्येक वर्षे काही अन्यधर्र्मीय महिलाही मोठ्या भक्तिभावाने करतात. ही परंपराच दोन्ही समाजांमध्ये एकोपा निर्माण करते. म्हणूनच बाबूजमाल दर्गा येथे दरवर्षी नियमित पहाटे उपवास धरून तो सायंकाळी सोडण्यासाठी आम्ही जमतो. - मंगल महादेव साळोखे, कोल्हापूर