शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: जिल्हा परिषद, पंचायतीचा आधार, झाले मंत्री, खासदार, आमदार

By समीर देशपांडे | Updated: January 22, 2026 16:11 IST

ग्रामीण नेतृत्व झाले तयार, सर्वांनी उठवला कामाचा ठसा

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्ह्याला अनेक मंत्री, खासदार आणि आमदार देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेची आणि पंचायत समित्यांची अतिशय मोलाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील सध्याचे दोन्ही मंत्री पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही अनुक्रमे भुदरगड आणि कागल पंचायत समितीच्या माध्यमातूनच झाली आहे.

आधी लोकलबोर्डाच्या माध्यमातून जी मंडळी सार्वजनिक जीवनात कार्यरत होती त्यांना १९६२ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमुळे एक नवीन राजकीय क्षितिज उघडले गेले. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दिनकरराव यादव हे अध्यक्षपद सोडल्यानंतर आमदार झाले. दुसरे अध्यक्ष बाळासाहेब माने हे पाचवेळा खासदार होते, तर त्यानंतरचे अध्यक्ष दिनकरराव मुद्राळे यांच्या बाबतीत नेमके उलटे घडले. आधी ते आमदार होते आणि नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.

राऊ धोंडी पाटील, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर, यशवंत एकनाथ पाटील, नरसिंगराव पाटील, भरमूआण्णा पाटील, हरिभाऊ कडव, बाबासाहेब पाटील-सरूडकर, तुकाराम कोलेकर, दिनकरराव जाधव, हसन मुश्रीफ, नामदेवराव भोईटे, संजयबाबा घाटगे, राजू शेट्टी, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, सत्यजित पाटील, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, अशोकराव माने, राहुल आवाडे यांच्या राजकीय कारकिर्दीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधूनच आकार मिळाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये काम करणारी हीच मंडळी पुढे आमदार, खासदार, मंत्री बनली.

या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केल्याने ग्रामीण भागाचे प्रश्न या सर्वांना तोंडपाठ. ते प्रश्न सोडविण्यासाठीची कामाची पद्धत माहिती असल्याने या खासदार, आमदारांनी आपल्या कामाचा एक वेगळाच ठसा उमटविल्याचे दिसून येते. यातील सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर, हसन मुश्रीफ, भरमूआण्णा पाटील, प्रकाश आबिटकर यांनी तर मंत्रिपदापर्यंत झेप मारली. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर आणखी एक इतिहास घडून आला आहे.

ज्या सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापतिपद भूषविले त्यांचे चिरंजीव संजय मंडलिक जे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते; त्यांनी लोकसभेत खासदार म्हणून जाण्याचा मान मिळविला, तर दुसरीकडे ज्यांनी सरपंच, सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि पाच वर्षे अध्यक्ष होण्याचा मान मिळविला त्या बाळासाहेब माने यांचे नातू, ज्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषविले ते धैर्यशील माने हे खासदार म्हणून संसदेत पोहोचले.

जि. प., पं. स.तील चार आमदार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये १० पैकी ४ आमदार असे निवडून आले की त्यांनी याआधी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये काम केले होते. यातील प्रकाश आबिटकर हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी थेट वर्णी लागली.

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून काम करतानाच त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविण्याचा मान मिळाला. दुसरे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा निवडून आले आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले. २०१७ ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलेले राहुल आवाडे आणि अशोकराव माने यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारली आणि हे दोघेही आमदार झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP: Cradle for Ministers, MPs, and MLAs Since Inception

Web Summary : Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samitis have nurtured many political careers. Ministers, MPs, and MLAs started here, understanding rural issues, impacting governance, and securing top posts.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MLAआमदार