शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘माऊली’च्या मदतीसाठी समाजाचे अनेक हात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : रस्त्यावर निराधार होऊन पडलेल्या व काही कारणाने कुटुंबापासून दूर असलेल्या आजी-आजोबांचा एक आधार ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : रस्त्यावर निराधार होऊन पडलेल्या व काही कारणाने कुटुंबापासून दूर असलेल्या आजी-आजोबांचा एक आधार बनलेल्या संभाजीनगरातील माऊली केअर सेंटरच्या मदतीसाठी समाजातून अनेक मदतीचे हात धावून आले. ‘लोकमत’मध्ये या संदर्भातील वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये समाजाच्या दातृत्वाला साद घातली होती.

गेल्या दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कर्नाटकातील हेरलेकर कुटुंबीय, कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवा काँग्रेसतर्फे, मार्केट यार्डातील व्यापारी बालेचांद बागवान आदींकडून तांदूळ (६५० किलो), ज्वारी (१५० किलो), गहू (१८० किलो), तेल (९० किलो), रवा (१०० किलो), पोहे (११० किलो), गूळ (९० किलो) ,कडधान्य (११० किलो) यासोबत देशातील एका मोठ्या फाउंडेशनने सीएसआर निधी कायमस्वरूपी आर्थिक स्वरूपात मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मंगल व भाऊ राहुल यांच्या मदतीने दीपक कदम यांनी या सेंटरची ८ जानेवारी २०१४ मध्ये पुईखडी येथे सुरुवात केली. आता संभाजीनगर येथील फ्लॅटमध्ये फिरस्त्या, निराधारांना मोफत व ज्यांना जेवढे पैसे देणे शक्य आहे ,तितके पैसे घेऊन शुश्रूषा करतात. पैसे देऊन आलेल्यांपैकी अनेकांना आता सध्या पैसे देणे शक्य नाही. तरीसुद्धा त्यांनी त्यांना ममत्वेने आसरा दिला आहे. संस्थेत एकूण ४८ आजी-आजोबा आहेत. त्यापैकी २१ जण फिरस्ते निराधार आहेत. त्यांची देखभाल आणि औषध उपचार करण्यासाठी मदतीची गरज आहे. दीपक हे उसनवारी आणि इतरांकडून कर्ज घेऊन हा खर्चाचा भार उचलतात. मागील लॉकडाऊनपासून दात्यांकडून मिळणारी मदत आटली. त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच मदतीचा झरा पुन्हा सुरू झाला.