माळी समाजाचे नेते प्रा. बी. आर. दुधगावकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST2021-07-21T04:17:55+5:302021-07-21T04:17:55+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माळी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. बी. आर. दुधगावकर (वय ९७) यांचे सोमवारी ...

Mali Samajache Nete Pvt. B. R. Dudhgaonkar passed away | माळी समाजाचे नेते प्रा. बी. आर. दुधगावकर यांचे निधन

माळी समाजाचे नेते प्रा. बी. आर. दुधगावकर यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माळी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. बी. आर. दुधगावकर (वय ९७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे सेवा केल्यानंतर प्रा. दुधगावकर यांनी माळी समाजाच्या उन्नतीसाठी चाळीस वर्षे काम केले. कोल्हापूर जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी समाजासाठी भरीव निधी संकलन केले. समाजाची पतसंस्थाही बळकट केली. वीरशैव माळी लिंगायत समाज, कोल्हापूर जिल्हा या संघटनेचे ते संस्थापक होते. समाजाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असायचा. समाजात तात्या या नावाने ते परिचित होते.

(फोटो: २००७२०२१-कोल-बी. आर. दुधगावकर निधन)

Web Title: Mali Samajache Nete Pvt. B. R. Dudhgaonkar passed away