शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Corporation Election: निवडणुकीचे वारे...सगळेच शोधताहेत ताकदीचे चेहरे

By पोपट केशव पवार | Updated: October 27, 2025 17:03 IST

एका प्रभागात १५ ते २० पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक

पोपट पवारकोल्हापूर : तब्बल पाच ते सहा वर्षांनंतर होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरवण्यासाठी महायुतीमहाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका एका प्रभागात १५ ते २० पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असले तरी उमेदवाराची आर्थिक व सामाजिक ताकद पाहून चेहरे निवडावे लागणार आहेत. त्यामुळे काँग्रेससह भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी व उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा कस लागणार आहे. महापालिकेच्या २० ही प्रभागांमध्ये आपल्या पक्षातून कितीजण इच्छुक आहेत याची चाचपणी नेत्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ताकदीचे उमेदवार आपल्या तंबूत आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी अनेकांवर 'गळ' टाकला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. यासाठी २० प्रभागातून ८१ उमेदवार निवडले जाणार आहेत. ही निवडणूक एकत्रित लढवायची की स्वबळावर याचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने सर्वच पक्षांनी सर्व प्रभागांमध्ये तयारी सुरू केली आहे. आप, मनसे व डाव्या पक्षांनीही या निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे.

सध्या प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार निवडण्यासाठी चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी केंद्रनिहाय वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरू केले आहे. - सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस, कोल्हापूर.निवडणुकीसाठी सर्व प्रभागांमध्ये आमची तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची चाचपणीही केली आहे; मात्र महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. - सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना, कोल्हापूर.महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवणार आहोत. या निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी आम्ही चार दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत वरिष्ठांकडे केली आहे. अजून आरक्षण जाहीर झालेले नाही. ते झाले की उमेदवार ठरवू. -आर.के.पोवार, शहराध्यक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, कोल्हापूर.सध्या आमच्याकडे ६५ इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. मात्र, महायुती म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत.युती झाली नाही तर मैत्रिपूर्ण लढू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील अनेकजण आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. -आदिल फरास, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, कोल्हापूर.महापालिका निवडणुकीसाठी सध्या आमच्याकडे २५ उमेदवार तयार आहेत. ही निवडणूक एकत्रित लढवण्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील; पण ही निवडणूक उद्धवसेना व मनसे एकत्र लढवणार हे निश्चित आहे. - रविकिरण इंगवले, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना, कोल्हापूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election: Parties seek strong candidates for upcoming polls.

Web Summary : Kolhapur's political parties gear up for municipal elections, seeking financially and socially strong candidates. All parties are assessing potential candidates across 20 wards, with leaders aiming to attract influential figures to their side.