शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Updates : तुफान पावसाने कोल्हापुरात शेकडो कुटुंबांचे स्थलांतर, पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून वाहू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 14:11 IST

Maharashtra Rain Updates : महापूराच्या परिस्थितीमुळे शेकडो कुटुंबांना जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे.

कोल्हापूरकोल्हापूर शहर व जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी तुफान पाऊस सुरू असून जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह अन्य सर्व नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. जिल्ह्यातील महापूराच्या परिस्थितीमुळे शेकडो कुटुंबांना जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. वाहतूक तसेच नागरी जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून तासागणिक वाढणारा पाऊस आणि नद्यांची पातळी यामुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे नागरिकांच्या बचावकार्यात तसेच महापूराचे संकट थोपविण्याच्या कार्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी ४३ फूट धोका पातळी ओलांडून सध्या ५० फूटांवरून  वाहत आहे. त्यामुळे शहरातील महापुराची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. शहरातील दुधाळी, उत्तेश्वरपेठ, शुक्रवारपेठ, सिध्दार्थनगर, रमणमळा, जाधववाडी, कदमवाडी, बापट कँम्प, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी कामगार चाळ, व्हीनस कॉर्नर, आदी परिसरातील शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या कुटुंबांसाठी महापालिकेने निवारा केंद्रे उभा केली असून तेथे वैद्यकीय सेवा, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

कोल्हापूरला जोडणारे राज्यमार्ग बंद

कोल्हापूरमधून रत्नागिरी, राधानगरी, आजरा, गगनबावडा, गारगोटी, आदी राज्यमार्ग महापुरामुळे बंद झाले आहेत. तसेच कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सांगली आणि कोल्हापूर-निपाणी हे मार्ग देखील बंद झाले आहेत.

२०१९ च्या महापुराची आठवण

जोरदार पावसामुळे सन २०१९ मध्ये कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. त्यापेक्षा जास्त सध्या याठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या महापुराची अनेकांना आठवण झाली.

 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूर