शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीस महामस्तकाभिषेक

By admin | Updated: May 11, 2015 01:07 IST

मंगलमय सोहळा : लक्ष्मीसेन महाराजांचा गौरव; ‘अहिंसा परमो धर्म की जय’चा घोष

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठाच्या विशाल प्रांगणात स्थित अमृतशिलेतील प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या २८ फूट उंच बृहन्मूर्तीचा ५४ वा वार्षिक पंचामृत महामस्तकाभिषेक मांगल्यपूर्ण वातावरणात, सवाद्य व विधिवत पद्धतीने रविवारी सायंकाळी संपन्न झाला. ‘भगवान आदिनाथ की जय...’, ‘जैन धर्म की, विश्वधर्म की जय...’, ‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘जैनं जयतू शासनम्...’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक समितीतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता आदिनाथ तीर्थंकरांच्या पंचामृत महामस्तकाभिषेकास सुरुवात झाली. कोल्हापूर व जिनकंचीचे मठाधिपती परमपूज्य लक्ष्मीसेन महास्वामी, नांदणी पीठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेवक सत्यजित कदम, आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीचे देणगीदार कासळीवाळ कुटुंबीयांचे प्रतिनिधी पारसकुमार व गुणमाला पांड्या यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम ११ सुवर्णकलशांचा भगवंतांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आदिनाथांच्या पायांजवळ विधिवत पूजा झाली. त्यामध्ये खोबऱ्यांचा खीस, हरभरा डाळ, साखर, गूळ, तूप, दूध, आमरसांनी पाद्यपूजा झाली. त्यानंतर विशेष द्रव्यपूजा आदिनाथांच्या मूर्तीवर कलशाभिषेकाने झाली. त्यामध्ये इक्षू अर्थात उसाचा रस, दुग्धाभिषेक, कलकचूर्ण, कषायचूर्ण, कुंकूम, हळदाभिषेक, सर्वाेषधी, अष्टगंध, चतु:षकोन, पुष्पवृष्टी, शांतीकलश मंत्रोच्चार झाल्यानंतर मंगल आरती होऊन महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. शहरातील सर्वच मंदिरांचे विश्वस्त तसेच श्रावक-श्राविका उपस्थित होते. यावेळी एकूणच वातावरण मंगलमय झाले होते. या महोत्सवासाठी परमपूज्य लक्ष्मीसेन महास्वामी यांचे मार्गदर्शनाखाली पद्माकर कापसे, राजू उपाध्ये, धन्यकुमार जैन, अभय भिवटे, वसंत आडके, अजित सांगावे आदींनी संयोजन केले. यावेळी जैन धर्मातील श्रावक, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सर्व मंदिरांचे विश्वस्त, पंडितगण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)