शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
13
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
14
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
15
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात : तयारीसाठी भाजपाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:36 IST

राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या निमित्ताने संघटनशक्ती दाखवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात : तयारीसाठी भाजपाची बैठकयात्रेच्या निमित्ताने संघटित शक्ती दाखवा: हाळवणकर

कोल्हापूर : राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या निमित्ताने संघटनशक्ती दाखवा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.

महाजनादेश यात्रेच्या स्वागताबरोबरच तयारीसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू हॉल येथे भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थावरून बोलत होते. प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटनमंत्री बाबा देसाई, सरचिटणीस विजय जाधव आदींची होती.

आमदार हाळवणकर यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा यशस्वी होईल, यात शंका नाही; त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या तालुकानिहाय कामकाजाच्या वेळापत्रकानुसार काम करावे, असे सांगितले.

महेश जाधव यांनी शहरात ही यात्रा येत असून, शहरातील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक, बूथ प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने यात्रा मार्गावर उपस्थित जोरदार स्वागत करावे, अशा सूचना दिल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ही यात्रा वेगळी करण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल चिकोडे म्हणाले, ‘यात्रेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांने कोणती जबाबदारी पार पाडायची हे सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे तयारी करावी,’ असे सांगितले. बाबा देसाई यांनी यात्रेसाठी जिल्ह्यातून उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या सहभागाच्या संख्येचा आढावा घेऊन त्याची नोंद घेतली.

यावेळी पी. जी. शिंदे, के. एस. चौगुले, आर. डी. पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, जयश्री जाधव, संतोष भिवटे, अजिंक्य चव्हाण, मारुती भागोजी, गणेश देसाई, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, सुरेश जरग, विजय आगरवाल, भरत काळे, चंद्रकांत घाटगे, आदी उपस्थित होते.

यात्रा मार्गावर झेंडे, फलक लावून वातावरण निर्मिती

भाजपातर्फे यात्रा मार्गावर ध्वज, बोर्ड लावून वातावरण निर्मिती करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले, तसेच सर्वांनी ही यात्रा नेटक्या नियोजनाद्वारे वेळापत्रकानुसार पार पाडावी, असे आवाहनही केले.
 

 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाkolhapurकोल्हापूरSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर