शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जादुगार जितेंद्र रघुवीर यांचे सांगली, कोल्हापुरात शनिवारपासून प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST

कोल्हापूर : प्रसिध्द जादूगार जितेंद्र रघुवीर हे लॉकडाऊननंतर आता संपूर्ण कुटुंबासाठी नवीन जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. शनिवारी ...

कोल्हापूर : प्रसिध्द जादूगार जितेंद्र रघुवीर हे लॉकडाऊननंतर आता संपूर्ण कुटुंबासाठी नवीन जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. शनिवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजता सांगली येथील भावे नाट्यगृहात, तर रविवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात हे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमधील प्रेक्षकांची अकरा महिन्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

गेल्या दोन आठवड्यात त्यांचे पुणे, रत्नागिरीमधील प्रयोग हाऊसफुल्ल होते. या प्रयोगांच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाला शंभर टक्के सुरक्षित मनोरंजनाची संधी उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अल्टरनेट सिटींग, सॅनिटायझेशन, ऑक्सिजन आणि टेम्परेचर चेकिंग, आदी स्वरूपातील आवश्यक ती दक्षता घेऊन हे प्रयोग होतील. अडीच तासांच्या या प्रयोगामध्ये सुमधूर संगीत, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, इजिप्शियन, अमेरिकन, जापनीज, अरेबिक जादूचे चित्तथरारक प्रयोग पाहता येणार आहेत. कोल्हापूर, सांगलीतील प्रयोगावेळी काही कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला जाणार आहे. या प्रयोगासाठी ऑनलाईन तिकीट नोंदणी सुरू आहे. या प्रयोगाचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जितेंद्र रघुवीर आणि संयोजक मारूती गायकवाड, विकास पावसकर यांनी केले आहे.

फोटो (१००२२०२१-कोल-मॅजिक शो अनलॉक)