शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

Maharashtra Election 2019 : स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 2:55 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर संस्थापक जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भगवान काटे यांनीही अखेर भाजपची वाट धरली. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संगीता खाडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे भाजपमध्येराष्ट्रवादीच्या संगीता खाडे, काँग्रेसचे दौलत देसाई यांनीही केला प्रवेश

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर संस्थापक जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भगवान काटे यांनीही अखेर भाजपची वाट धरली. चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा संगीता खाडे, काँग्रेसचे दौलत देसाई यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.कोल्हापूरात शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या महायुती मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना २00२ मध्ये झाली. त्यावेळीपासून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष असणारे भगवान काटे यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली आहे.यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाठोपाठ स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशअध्यक्ष रवीकांत तुपकर यांनीही पक्ष सोडून कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. भाजपच्या मंत्रिमंडळात रयतचे सदाभाउ खोत मंत्री आहेत.भगवान काटे गेल्या काही वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी पक्षात कार्यरत होते आणि गेली दहा वर्षे त्यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत जिल्ह्यात 'स्वाभिमानी'ची बांधणी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील कारखानदारांविरोधात रस्त्यांवर लढा दिला. बारामती, इंदापूर, पंढरपूर येथील आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतला होता.चंद्रकांत पाटील यांनी काटे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, काँग्रेसचे दौलत देसाई यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019