शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीकडे ‘नॉलेज लाईफ’च्या दृष्टीने पाहा

By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST

भारत खराटे : लोकमत बाल विकास मंच, चाटे शिक्षण समूहातर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

कोल्हापूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडे केवळ ‘कॉलेज लाईफ’पूर्वीचा एक टप्पा म्हणून न पाहता ‘नॉलेज लाईफ’मधील मूलभूत पायरी या दृष्टीने पाहा़ एकाच अभ्यासपद्धतीचा अवलंब करा. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षेसाठी ही पद्धत उपयुक्त ठरेल़ सराव प्रश्नपत्रिकांवर भर द्या, असा कानमंत्र चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे यांनी विद्यार्थी व पालकांना दिला़ ‘लोकमत’ बाल विकास मंच आणि चाटे शिक्षण समूहातर्फे राजारामपुरी येथील आप्पाज कॉम्प्लेक्स येथे आज, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते़ दहावी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा आणि संधी हा मार्गदर्शनाचा विषय होता़ खराटे म्हणाले, दहावीच्या परीक्षेतील अंतिम टप्प्यात तयारी करताना हाती असलेले दोन महिने कौशल्यपूर्वक वापरले पाहिजेत़ ऐनवेळी अभ्यासपद्धती न बदलता सुरुवातीपासून ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, तीच पद्धत अंतिम टप्प्यातही वापरली पाहिजे़ प्रश्नपत्रिकांचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे़ या सरावामुळे काळ, काम आणि वेग याचे अचूक आकलन होईल़ परीक्षेचे वेळापत्रक, आरोग्य, शिक्षकांकडून पाल्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, याबाबत पालकांनी आपला वेळ दिला पाहिजे़ चाटे शिक्षण समूहाच्या विविध उपक्रमांबाबत बोलताना खराटे म्हणाले, चाटे शिक्षणसमूहांतर्गत ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, हायस्कूल, प्ले गु्रप व नर्सरी या शैक्षणिक सुविधांबरोबरच मेडिकल, जेईई मुख्य आणि आयआयटी - जेईई (अ‍ॅडव्हान्स), आदी परीक्षांची तयारीही करून घेतली जाते़ चाटे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचे प्राचार्य प्रशांत देसाई यांनी, दहावीमध्येच विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे कंटेंट क्लीअर करून घेतल्यास जेईई, एआयपीएमटी व आयआयटीसाठी फायदा होईल, असे मत व्यक्त केले़यावेळी चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ जे़ पाटील, कोल्हापूर विभागाचे प्रमुख प्रा़ सर्जेराव राऊत, शाहूपुरी शाखा व्यवस्थापक प्रा़ एल़ डी़ थोरात, पालक प्रतिनिधी राजेश शिंदे, तसेच ‘लोकमत’चे इव्हेंट प्रमुख दीपक मनाठकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ दुसऱ्या सत्रात प्रा़ सर्जेराव राऊत यांनी ‘दहावीच्या शिक्षणाकडे झेपावताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना, सातवी ते नववी ही शैक्षणिक वर्षे स्पर्धा परीक्षेचा पाया तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत, असे मत व्यक्त केले़ यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सीमा कदम उपस्थित होत्या. प्रा. प्रज्ञा गिरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)