शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’ दिमाखात सुरू

By admin | Updated: March 5, 2017 00:52 IST

मुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन; असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स

कोल्हापूर : परिपूर्ण कुटुंबाच्या गरजा डोळ्यांसमोर ठेवून अद्ययावत, ब्रॅँडेड इलेक्ट्रॉनिक विश्वातील वस्तूंनी परिपूर्ण ‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो २०१७’ या प्रदर्शनाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेस; तर असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि. हे आहेत. ब्रॅँडेड लॅपटॉप, डेस्कटॉप, अद्ययावत स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुनिया हौशी कोल्हापूरकरांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे उद्या, सोमवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेसचे सिद्धार्थ शहा, आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि.चे अरुण माणगावे, गिरीश सेल्सचे गिरीश शहा, सुभाष फोटोजचे शंभू ओऊळकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी उपस्थित होते. शनिवार हा प्रदर्शनाचा पहिलाच दिवस असला तरी सकाळपासूनच ग्राहकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील हे अनोखे प्रदर्शन ‘घरातल्या प्रत्येकासाठी.... प्रत्येक घरासाठी’ या थीमवर आधारलेले असल्यामुळे अनेकांनी कुटुंबासह प्रदर्शन पाहण्यास उपस्थिती लावली होती. दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरविण्यात येत असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार अशा सर्वच वर्गांसाठी आवश्यक सर्वच गॅझेट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला भेट देणारे नागरिक प्रत्येक स्टॉलवर थांबून माहिती घेण्यात मग्न होते व अद्ययावत माहिती मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. स्टॉलवरील व्यक्तीही ग्राहकांच्या शंकांना उत्तरे देत होते; यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी येऊन विविध स्टॉलवरील अद्ययावत स्मार्टफोन, लॅपटॉप्सची माहिती घेतली. अनेकांनी आपल्या आवडीच्या वस्तूंचे बुकिंगही केले. सर्वांसाठी उपयोगी पडतील अशा गॅझेटस्च्या दुनियेचे द्वार प्रदर्शनाच्या माध्यमातून खुले झाले असून, त्यामध्ये ब्रॅँडेड कंपन्यांच्या वैयक्तिक, गृहोपयोगी, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तरी या प्रदर्शनाला हौशी कोल्हापूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शनातील गॅझेट्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अर्थसाहाय्य, हप्त्यांची सोय यांसह विविध सवलती व आकर्षक आॅफर्सही देण्यात येत आहेत.ग्राहकांच्या सोयीसाठी प्रत्येक स्टॉलवर कार्ड पेमेंट, स्वाइपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनीही कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.आयटीसह गृहोपयोगी गॅझेट्स या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यासाठी व खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही वस्तू या आज नाही तर उद्या हमखास उपयोगी पडणाऱ्या आहेत. - अरुण माणगावे, आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि.कोल्हापुरात असे गॅझेट्सचे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.- सिद्धार्थ शहा, एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅँड सर्व्हिसेस प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर सर्व कंपन्यांच्या ब्रॅँडेड वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासह विविध आकर्षक आॅफर्स, अर्थसाहाय्य, सवलती, भेटवस्तू योजनाही यानिमित्ताने खरेदीदारांसाठी देण्यात येत आहेत.- गिरीश शहा, गिरीश सेल्सखरेदीवर आकर्षक आॅफर्स प्रदर्शनातील गॅझेट्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अर्थसाहाय्य, हप्त्यांची सोय यांसह विविध सवलती व आकर्षक आॅफर्सही देण्यात येत आहेत.