शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा युवक काँग्रेसचा मूक मोर्चा

By admin | Updated: March 9, 2015 23:50 IST

पानसरेंच्या हल्लेखोरांना पकडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आठ दिवसांत पकडून त्यांना फाशी द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर लोकसभा युवक काँग्रेस समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे दोनशेहून अधिक युवक कार्यकर्ते तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सहभागी झाले होते. पानसरे यांच्या हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा भारतीय राज्यघटना विरोधी आहे. केवळ हल्लेखोरांनाच न पकडता त्यामागील शक्ती व संघटनांवरही योग्य तो पायबंद घालावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडले नाही तर तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही मोर्चाच्यावतीने देण्यात आला. युवक काँग्रेसच्या या मूकमोर्चाला स्टेशन रोडवरील काँग्रेस भवनपासून सुरुवात झाली. मोर्चात युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरउन्हातून हा मोर्चा स्टेशन रोड, बसंत-बहार चित्रमंदिरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल वर्धा, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शंभूराजे देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, विद्याधर गुरबे, विष्णू पाटील, उत्तम आंबवडे, जितेंद्र यशवंत, रुपाली पाटील, योगेश कांबळे, राम पाटील, सरदार पाटील, वैभव तहसीलदार,संदीप पाटील, दीपक थोरात, कृष्णात धोत्रे, अमर देसाई आदींनी केले. मोर्चाच्यावतीने एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)