पशुधनाला तातडीने सेवा मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST2021-02-21T04:44:24+5:302021-02-21T04:44:24+5:30

जयसिंगपूर : पशुवैद्यकीय ॲम्ब्युलन्समुळे शिरोळ तालुक्यामधील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तातडीने अत्यावश्यकप्रसंगी पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी मदत होणार आहे. डॉक्टरसह ...

Livestock will get immediate service | पशुधनाला तातडीने सेवा मिळेल

पशुधनाला तातडीने सेवा मिळेल

जयसिंगपूर : पशुवैद्यकीय ॲम्ब्युलन्समुळे शिरोळ तालुक्यामधील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तातडीने अत्यावश्यकप्रसंगी पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी मदत होणार आहे. डॉक्टरसह अत्याधुनिक साधनसामग्री, पुरेसा औषधसाठा या वाहनांमध्ये उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगली सेवा मिळेल, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत शिरोळ तालुक्यात फिरत्या वाहन (ॲम्ब्युलन्स) मंत्री यड्रावकर यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाले आहे. याचा लोकार्पण शनिवारी मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते झाला. यावेळी पं. स. सभापती कविता चौगुले प्रमुख उपस्थित होत्या.

अर्जुनवाड येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी ६० लाख, चिपरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी संरक्षक भिंत उभारणे व चेनलिंक कंपाऊंड बांधणे कामासाठी १९ लाख तसेच जांभळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीस संरक्षक भिंत उभारणे व चेनलिंक कंपाऊंड बांधण्याकरिता २० लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यामधून मंजूर करून घेतला असल्याची माहिती मंत्री यड्रावकर यांनी दिली.

यावेळी डॉ. सुनील केतकर, डॉ. आर. के. रानभरे, डॉ. राजगुडे, डॉ. बांदेकर, डॉ. देशमुख, डॉ. गावडे, डॉ. चव्हाण, डॉ. शिंदे, राजेंद्र झेले उपस्थित होते.

फोटो - २००२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पशुवैद्यकीय ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुनील केतकर, डॉ. आर. के. रानभरे, कविता चौगुले, राजेंद्र झेले उपस्थित होते.

Web Title: Livestock will get immediate service