शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मोनेरा’च्या मोहनकडून आंब्यातील सर्पांना जीवदान

By admin | Updated: August 18, 2015 22:14 IST

पर्यावरणाची जोपासना : सर्पकुळातील दुर्मीळ जातींच्या रक्षणाचे व संशोधनाचे काम

आर. एस. लाड -आंबा  नागपंचमीला नागाचे पूजन करून शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सर्पाचे महत्त्व प्राचीन काळापासून सणाच्या माध्यमातून जपले जाते. काही मंडळी नागपंचमीला नागाचे पूजन करतात, तर अन्यवेळी साप म्हटले की, हातात काठी घेतात. मात्र, आंबा- विशाळगड या जैवविविधता संपन्न भागात कोल्हापूर निसर्गमित्र व मोनेरा फाउंडेशन येथील सर्पकुळातील दुर्मीळ जातींच्या रक्षणाचे व संशोधनाचे काम गेल्या काही वर्षांपासून करून, निसर्गप्रेमाचे महत्त्व समाजात फुलवत आहेत.मोनेरा फाउंडेशनचे सचिव प्रमोद माळी व कार्याध्यक्ष मोहन घाटगे हे सर्पमित्र जगात दुर्मीळ असलेल्या मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर यासह नाग, अजगर, मण्यार, धामण, कौड्या, पहाडी तस्कर, विटेकरी मांडूळ फुरसे, घोणस, हरणटोळ, गवत्या यांचे संशोधन करीत संरक्षणाचीही बाजू भक्कम करीत आहेत. कोल्हापूरचे सर्प अभ्यासक उमाकांत चव्हाण यांनी पश्चिम घाटातील आंबा-विशाळगड येथील जंगलात जगात दुर्मीळ असलेल्या मलबार पिट वायपर या अतिविषारी प्रजातीबद्दल संशोधनात्मक अभ्यास करून त्याच्या संवर्धनाचा जागर केला. त्यातून येथील मोहन व प्रमोद यांचेसारखे स्थानिक सर्पमित्र सर्पसंरक्षणाची धुरा सांभाळीत आहेत. जंगला लगतच्या वस्त्या, रिसॉर्ट व हॉटेल तसेच सार्वजनिक कार्यालयातील सर्पाचा मुक्काम सामान्यांना धडकी भरवणारा असला तरी या सर्पमित्रांना पाचारण करून त्यांना सुरक्षित पकडून त्यांच्या अधिवासामध्ये सोडणारे पर्यावरणीय काम जोपासत आहेत.मोनेराचे इंद्रजित सूर्यवंशी वारणा परिसरात सर्प संवर्धनाची जागृती करीत आहेत. मोनेराच्या मोहनची जणू सापांनाच मोहिनी पडलेली दिसते. अंधश्रद्धेपोटी व काही आजारांवर तेल काढण्यास विशिष्ट सापांची तस्करी केली जाते. यावर अंकुश ठेवणारे काम येथे होताना दिसते. खोपोली येथील सर्पसंशोधन संस्थेचे प्रमुख प्रदीप कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात वाघझरा परिसरात भेट देऊन पिट वायपर व अन्य दुर्मीळ सापाच्या संशोधनास हा परिसर महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. मोहन घाटगे यांच्या गेल्या तीन वर्षांच्या निरीक्षणात हरणटोळ सहज व मोठ्या प्रमाणात दिसणारा साप यंदा तुलनेने कमी पहायला मिळतो. याची कारणे शोधून तसे उपाय शोधावे लागतील. रोडकिल्सबाबत जागृतीची गरजकोल्हापूर निसर्गमित्र मंडळाचे सर्पतज्ज्ञ किशोर शिंदे यांनी पोलादपूर, महाबळेश्वर व घाटरस्ते या भागात सापांचे रोडकिल्स मोठ्या प्रमाणात होते. जंगलातील रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या जमिनीच्या कंपनांची तीव्रता कमी असते. त्यामुळे रस्ता ओलांडणारे साप वाहनाखाली बळी पडतात. साहजिकच दुर्मीळ साप अतिदुर्मीळ होतात. याउलट अन्य मार्गांवर कंपनांची तीव्रता जास्त असल्याने रोडकिल्स कमी होतात. यावर उपाय म्हणून जंगल परिसरातील रात्रीचे दळणवळण बंद होण्याची गरज शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.