शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीच्या दलदलीत कमळ फुलणार नाही : प्रल्हाद चव्हाण

By admin | Updated: October 31, 2015 00:24 IST

राज्यात आणि केंद्रात जनतेला भुलवून भाजपने सत्ता मिळविली. राज्यातील सत्तेत चंद्रकांत पाटील यांना महत्त्वाचे मंत्रिपदही मिळाले; पण

कोल्हापूर : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला कोल्हापुरात ८१ प्रभागांत उमेदवार मिळाले नाहीत. हे पालकमंत्र्यांचे दुर्दैव आहे; पण काहीही करून महापालिकेत सत्ता मिळवायची, या उद्देशाने त्यांनी ताराराणी आघाडीशी घरोबा केला; पण गुन्हेगार व गुंडप्रवृत्ती ही संस्कृती असणाऱ्या ताराराणी आघाडीशी सलगी दादांना लाभणार नाही. दलदलीत कमळ फुलतं.. हे जरी खरे असले तरी गुन्हेगारीच्या दलदलीत कमळ फुलणार नाही, नव्हे कोल्हापूरची जनता तसे होऊच देणार नाही, असे पत्रक काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे.राज्यात आणि केंद्रात जनतेला भुलवून भाजपने सत्ता मिळविली. राज्यातील सत्तेत चंद्रकांत पाटील यांना महत्त्वाचे मंत्रिपदही मिळाले; पण या मंत्रिपदाचा कोल्हापूरच्या विकासासाठी गेल्या वर्षभरात काहीही फायदा झालेला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला ८१ उमेदवार मिळाले नाहीत. उलट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन शहराला बदनाम करणाऱ्या ताराराणी आघाडीबरोबर अभद्र युती करण्यात धन्यता मानली. भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्यांची उमेदवारांची यादी पाहता, यातील बहुतेक जण ताराराणी आघाडीचे पर्यायाने महाडिक यांचेच यांचे कार्यकर्ते आहेत. अशाप्रकारे पालकमंत्र्यांनी भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला महाडिक यांच्या दावणीला बांधले आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला. महापालिकेच्या सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या पालकमंत्र्यांना कोल्हापुरात कमळ फुलवायचे आहे. किंबहुना हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. असे असले तरी त्यांनी ज्या ताराराणी आघाडीशी युती केली आहे. त्यामध्ये गुंड, गुन्हेगार, मटकेवाले, टीडीआर सम्राट यांचाच भरणा आहे. या दलदलीत कधीही कमळ फुलणार नाही. हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता या अभद्र युतीला त्यांच्या विचारांना कोल्हापुरात थारा देणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)