शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीकांसाठी कोल्हापूर बंद करू

By admin | Updated: September 1, 2015 23:54 IST

मराठा महासंघ महिला आघाडी : अंबाबाईला नाग, सिंह प्रतीकांसाठी साकडे

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर नाग आणि सिंहाची योग्य प्रतीके घडविण्यात यावीत, यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीतर्फे मंगळवारी अंबाबाईच्या चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी ‘उदे गं अंबाबाई’, ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला. नाग आणि सिंह ही प्रतीके लवकर घडविली नाहीत, तर ‘कोल्हापूर बंद’ पुकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सकाळी साडेअकराच्या सुमारास भवानी मंडप येथे जमल्या. अंबाबाईच्या मूर्तीवर नाग व सिंहाची प्रतीके घडविण्यात चूक झाल्यामुळे या रणरागिणींनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी अंबाबाईच्या जयघोषाच्या घोषणा देत या महिलांनी दक्षिणद्वाराकडून मंदिरात प्रवेश करीत देवीचे दर्शन घेतले. सत्याला सत्य म्हणण्याची ताकद दे, महाराष्ट्रावरील दुष्काळावर मात कर, तुझ्या चरणी महिलांना सन्मानपूर्वक स्थान दे, असे साकडे महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईच्या चरणी घातले. यावेळी जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले म्हणाल्या, अंबाबाई देवीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान गंभीर चुका झाल्या आहेत. मूर्तीवर नाग आणि सिंहाची प्रतीके घडविलेली नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मूर्तीवरील ही प्रतीके त्वरित घडविण्यात यावीत; अन्यथा आम्ही ‘कोल्हापूर बंद’ची हाक देऊ. दीप्ती सासने म्हणाल्या, प्रतीके लवकर न घडविल्यास महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पुजाऱ्यांना देवळात प्रवेश करू देणार नाहीत. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, अंबाबाई ही अंबाबाईच राहिली पाहिजे. तिच्या मूर्तीवर नाग आणि सिंह प्रतीके घडविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अंबाबाईला ‘महालक्ष्मी’ करण्याचा डाव काहीजण आखत आहेत. तो महासंघ उधळून लावील. यावेळी रुक्मिणी शिंदे, दीपा डोणे, विद्या साळोखे, संगीता घोरपडे, उषा लांडे, संगीता राणे, भारती रसाळ, नीता पाटील-सरुडकर, माधुरी अर्जुनीकर, माया मिसाळ यांच्यासह सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या.