शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चला..गोमती ओढा आपण स्वच्छ करूया; निसर्गभान मोहीम : सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शुद्ध पाणी, शुद्ध हवा, सकस अन्न मिळण्याचा हक्क जसा संविधानाने आपल्याला दिला आहे, तसेच आपली हवा, आपले ...

कोल्हापूर : शुद्ध पाणी, शुद्ध हवा, सकस अन्न मिळण्याचा हक्क जसा संविधानाने आपल्याला दिला आहे, तसेच आपली हवा, आपले पाणी शुद्ध ठेवण्याची जबाबदारी देखील संविधानाने आपल्यावर सोपवली आहे. त्याची दखल घेत आज रविवारी (दि. ४) राजेंद्रनगर परिसरातील गोमती ओढा स्वछता मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत गोमती किनारी राहणारे नागरिक मोरेवाडी शंभर फुटी रस्त्यावरील मुख्य पुलाजवळ जमणार आहेत. तिथून ओढा आणि आसपासच्या स्वच्छतेला सुरुवात करणार आहेत.

राजेंद्रनगर, मोरेवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय सोसायटी, शाहू पार्क परिसर, इंदिरा सोसायटी, चिले कॉलनी, म्हाडा कॉलनी, डी. आर. भोसलेनगर, समता कॉलनी, शांतिनिकेतन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी या मोहिमेत भाग घेणार आहेत. मोरेवाडीच्या मागील बाजूस असलेल्या चित्रनगरीच्या डोंगरावर उगम पावणारा गोमती ओढा आपल्या भागातून वाहत पुढे जाऊन जयंती नदीला मिळतो. सुदैवाने कोल्हापूरला समृद्ध निसर्ग आणि पाण्याची मुबलक उपलब्धता लाभली आहे; पण गेल्या काही वर्षांत वाढत्या वासहतींमुळे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे, तसेच भूजलाची पातळी देखील वेगाने खालावते आहे. याला अनेक बाबी जबाबदार आहेत; पण लोकसहभागातून आणि सजग नागरिकांच्या जाणीवपूर्वक हस्तक्षेपातून आपण काही प्रमाणात आपले पर्यावरण समृद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठीच ही मोहीम आहे.