शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या दुचाकीवर बिबट्याची झेप

By admin | Updated: October 16, 2015 00:03 IST

दोघे जखमी : म्हासोली ग्रामस्थांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण

उंडाळे : कारखान्यातील काम आटोपून दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन कामगारांवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये संबंधित कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. म्हासोली (ता. कऱ्हाड) येथे ‘पवार मळा’ नावाच्या परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. सर्जेराव ज्ञानू मोरे (रा. जखिणवाडी, ता. कऱ्हाड) व उद्धव यशवंत पवार (रा. तांबवे, ता. कऱ्हाड) अशी जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तांबवे येथील उद्धव पवार व जखिणवाडी येथील सर्जेराव मोरे हे दोघेजण शेवाळेवाडी-म्हासोली येथील रयत कारखान्यात कामाला आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून कऱ्हाडच्या दिशेने निघाले, ते म्हासोली गावच्या हद्दीतील ‘पवार मळा’ नावच्या परिसरात आले असताना रस्त्याकडेला दुचाकीच्या प्रकाशात एका प्राण्याचे डोळे चमकताना त्यांना दिसले. मात्र, कोल्हा अथवा कुत्रा असावा, असा समज होऊन सर्जेराव व उद्धव यांनी दुचाकी न थांबविता पुढे आणली; मात्र रस्त्याकडेला थांबलेल्या बिबट्याने अचानक त्या दोघांवर झेप घेतली. त्यामुळे तोल जाऊन सर्जेराव व उद्धव दुचाकीसह खाली कोसळले. त्यावेळी बिबट्याने दोघांवर झडप घातली. दरम्यान, त्याचवेळी कृष्णात शिंदे व बाळकृष्ण पाटील हे दुसऱ्या दुचाकीवरून पाठीमागून आले. त्यांनी हा प्रकार पाहिला. दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून नजीकच्या झाडीत धूम ठोकली. कृष्णात शिंदे व बाळकृष्ण पाटील यांनी जखमी सर्जेराव व उद्धव यांना उपचारार्थ उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे म्हासोली परिसरात नागरिकांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)अनेक महिन्यांपासून वावरम्हासोली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. ठिकठिकाणी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.