धरणगुत्तीच्या एकावर सावकारकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST2021-01-22T04:23:46+5:302021-01-22T04:23:46+5:30

बेकायदा सावकार प्रकरणी धरणगुत्ती ( ता. शिरोळ )येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. आण्णासो उर्फ अनू बाळासो पाटील ...

Lending offense on one of the dams | धरणगुत्तीच्या एकावर सावकारकीचा गुन्हा

धरणगुत्तीच्या एकावर सावकारकीचा गुन्हा

बेकायदा सावकार प्रकरणी धरणगुत्ती ( ता. शिरोळ )येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. आण्णासो उर्फ अनू बाळासो पाटील असे संशयिताचे नाव असून याबाबत सुजय येजरे ( रा. राजेंद्रनगर कोल्हापूर)यांनी शिरोळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे .

पोलिसातून मिळालेली माहिती अशी,बेकायदा सावकारकी प्रकरणी सहकार विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.त्या अनुषंगाने १८ डिसेंबर २०२० रोजी सहकार खात्यांच्या पथकाने शिरोळ तालुक्यात छापे टाकले होते केलेल्या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली होती.

या कारवाईत संशयित आरोपी पाटील याच्याकडे कोरे धनादेश , स्टॅम्प ,उसनवार पावत्या आदी साहित्य जप्त करण्यात आले होते.आक्षेपार्ह कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकार विभागाकडून गुरूवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली .

Web Title: Lending offense on one of the dams